युद्धादरम्यानच रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली; जगात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 08:33 AM2022-10-27T08:33:49+5:302022-10-27T08:36:58+5:30

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर युद्धात इराणी ड्रोन वापरल्याचा आरोप केला. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सुमारे 400 ड्रोनचा वापर केला आहे.

During the war, Russia deployed nuclear forces for trials; world in Tension | युद्धादरम्यानच रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली; जगात खळबळ

युद्धादरम्यानच रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली; जगात खळबळ

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आता आठ महिने होऊन गेले आहेत. काही दिवसांचे युद्ध एवढे दिवस लांबेल असे कोणालाच वाटले नव्हते. अशातच आता रशियाने अणुबॉम्बच्या दलाचा युद्धाभ्यास सुरु केल्याने खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी रशियाच्या रणनीतिक दलांच्या प्रशिक्षणाची पाहणी केली. ही दले अण्वस्त्रांच्या हल्ल्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यास सक्षम आहेत. 

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर युद्धात इराणी ड्रोन वापरल्याचा आरोप केला. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सुमारे 400 ड्रोनचा वापर केला आहे. त्याचवेळी अमेरिकेने रशियाला पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या वापराविरोधात इशारा दिला असून ही अत्यंत गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे.

रशियाने नोटीस दिली आहे की ते आपल्या आण्विक क्षमतांचा नियमित अभ्यास करणार आहेत. याचवेळी रशिया युरोपमधील एका सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात काही गुप्त हालचाली करत असल्याचा दावा युक्रेनच्या अणुऊर्जा ऑपरेटरने केला आहे. 

जर रशियाने अण्वस्त्र वापरले तर ती गंभीर चूक ठरेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशिया "डर्टी बॉम्ब" किंवा अण्वस्त्रे तैनात करण्याची तयारी करत आहे का, या प्रश्नावर उत्तर दिले. हे एक फॉल्स फ्लैग ऑपरेशन आहे असे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मला माहित नाही. परंतु जर तसे केले तर ती एक गंभीर चूक असेल, असे बाय़डेन म्हणाले. 

Web Title: During the war, Russia deployed nuclear forces for trials; world in Tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.