किव्ह - जवळपास आठ महिने होत आले तरी रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध निर्णायक स्थितीत पोहोचू शकलेले नाही. आता युद्धादरम्यान, युक्रेनने एक अजब प्लॅन आखला आहे. युक्रेनी महिलांना सेक्सी ड्रेस घालून चित्याप्रमाणे तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्लॅनमुळे रशियाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनियनांच्या मते महिला असं करून #FreeTheLeopards मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. युक्रेनमध्ये हे अभियान मोठ्या प्रमाणावर चालवले जात आहे. तसेच त्या माध्यमातून रशियाविरोधातील युद्धात युक्रेनच्या मदतीसाठी लियोपार्ड बॅटल टँक देण्याचे आवाहन जर्मनीला केले जात आहे. मात्र जर्मनीने अद्यापपर्यंत युक्रेनची ही मागणी मान्य केलेली नाही.
याबाबत समोर येत असलेल्या वृत्तानुसार #FreeTheLeopards अभियान चालवून युक्रेन जर्मन सरकारला लियोपार्ट बॅटल टँक आपल्या मदतीसाठी पाठवण्याचे आवाहन करत आहे. त्यामाध्यमातून रशियाविरोधात जोरदार आघाडी उघडून पुतीन यांच्या सैन्याने बळकावलेला भूभाग परत मिळवण्याचा युक्रेनचा मानस आहे.
मात्र लियोपार्ड बॅटल टॅक देण्याच्या युक्रेनच्या आवाहनाला जर्मनीकडून सातत्याने नकार मिळत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांचे सहकारी असलेल्या मायखाइलो पोडोलिक यांनी याबाबत दोन्ही देश कराराच्या जवळ आहेत, असा दावा केला आहे.
मायखाइलो पोडोलिक यांनी सांगितले की, मला वाटते की, लियोपार्ट बॅटल टँकसाठी जर्मनी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सर्वसंमती बनवण्यात यशस्वी ठरेल. आम्ही युरोपच्या सुरक्षेसाठी कुठलीही किंमत मोजण्यास तयार आहोत. मात्र हत्यारांसह आमची मदत करा.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सुरुवात होऊन आठ महिन्यांहून अधिक अवधी झाला आहे. दोन्हीकडील हजारो सैनिक या युद्धात मारले गेले आहेत. यादरम्यान, रशियाने युक्रेनच्या चार प्रांतांचे आपल्या भूभागात विलिनीकरण केले आहे. दुसरीकडे युक्रेन हार मानण्यास तयार नाही आहे. रशियाच्या ताब्यात गेलेला काही भूभाग परत मिळवल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे.