न्यूयॉर्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या नवीन प्रशासनासोबत जवळून काम करण्यास भारत उत्सुक आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत पार्वथनेनी हरीश यांनी व्यक्त केले.
कोलंबिया विद्यापीठात एका संवाद सत्रादरम्यान ते म्हणाले की, आम्ही अमेरिकन नागरिकांच्या निवडीचा आदर करतो. अध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही भारतासोबत खूप जवळचे संबंध होते. प्रमुख जागतिक आव्हाने, या मुद्द्यावर ते बोलत होते.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांनी वित्तीय सेवा कंपनी कँटर फिट्झगेराल्डचे अध्यक्ष आणि सीईओ हॉवर्ड लुटनिक यांची वाणिज्य मंत्रिपदी नियुक्ती केली आहे.
कुस्तीपटू लिंडा मॅकमोहन शिक्षणमंत्री
नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांनी अब्जाधीश व्यावसायिक कुस्तीपटू लिंडा मॅकमोहन यांची शिक्षणमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांच्या २०१७ ते २०१९ या पहिल्या कार्यकाळात मॅकमोहन यांनी लघू व्यवसाय प्रशासनाचे नेतृत्व केले.