नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे समपदस्थ नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अलीकडे त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत समाधान व्यक्त केले आहे. उभय देशांतील सर्व प्रलंबित मुद्यांवर तुमच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगून शरीफ यांनी आपल्या संयुक्त आर्थिक धोरणातच गरीब वर्गाचे भवितव्य सामावलेले असल्याचे अधोरेखित केले. शरीफ यांचे हे पत्र शनिवारी पंतप्रधान कार्यालयाला प्राप्त झाले. मोदी यांच्या शपथविधी सोहळ््याला शरीफ आवर्जून उपस्थित होते. शरीफ आपल्या भारत भेटीवर समाधानी नसल्याचे वृत्त अलीकडेच झळकले होते. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी मोदींना पाठविलेल्या पत्राला विशेष महत्त्व आले आहे.
मोदींसोबत काम करण्यास उत्सुक -शरीफ
By admin | Published: June 11, 2014 11:09 PM