टोकियो : दक्षिण जपानच्या कुमामोटो शहराजवळ शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी रिश्टर स्केलवर ७ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. प्रशासनाने त्सुनामीचा इशारा दिली आहे. गुरुवारी याच भागात झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.४ एवढी होती व त्यात नऊ जण ठार तर शेकडो जण जखमी झाले. लोक दहशतीखाली असतानाच दुसऱ्या दिवशी अधिक तीव्रतेचा धक्का बसला. त्यामुळे लोक गर्भगळीत झाले आहेत. प्रशासनाने त्सुनामीचा इशारा दिल्यामुळे किनारपट्टीतील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर होता.
द. जपानमध्ये पुन्हा भूकंप
By admin | Published: April 16, 2016 4:30 AM