ऑनलाईन लोकमतइराक : इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली, तर केंद्रबिंदू १९ कि.मी. खोल भूगर्भात होता. केंद्रस्थानापासून हलबजा ४१ कि.मी. सुलेमानिया ८९ कि.मी. तर बगदाद २१२ कि.मी.वर आहेत.