तान्जुंग - गेल्या आठवड्यात इंडोनेशियात झालेल्या ७ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने पर्यटन केंद्र असलेले लोम्बॉक बेट १० इंच (२५ सेंमी) वर उचलले गेल्याचा निष्कर्ष अमेरिकन वैज्ञानिकांनी काढला आहे. या बेटावर झालेल्या भयावह भूकंपानंतर आणखी किमान ५०० लहान धक्केही बसले होते.अमेरिकेतील ‘नासा’ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधील वैज्ञानिकांच्या संयुक्त तुकडीने ५ आॅगस्टच्या भूकंपानंतर लोम्बॉक बेटाची उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊन त्यांचा अभ्यास केला असता बेटाच्या पातळीत फरक पडल्याचे दिसून आले. ईशान्येला जेथे भूकंपाचे मुख्य केंद्र होते, तेथे जमिनीला भेग पडून बेटाची जमीन पाव मीटरने वर आल्याचे दिसले. इतर ठिकाणची जमिनीची पातळी दोन ते सहा इंचांनी (५ ते १५ सेंमी) खाली गेल्याचे निदर्शनास आले.आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, बळींची संख्या ३९९ वर पोहोचली आहे. याखेरीज ६८ हजार घरे उद््ध्वस्त होऊन ३.९ लाख लोक बेघर झाले आहेत. भूकंपाने झालेले भूस्खलन व कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अजूनही काही लोक अडकले असल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. मदत व बचावकार्य संपलेले नसल्याने घोषित आणीबाणीची मुदत प्रशासनाने २५ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे.इंडोनेशिया ‘रिंग आॅफ फायर’ म्हणून ओळखल्या जाणाºया सक्रिय भूकंपप्रवण पट्ट्यावर वसले असल्याने तेथे वरचेवर भूकंप होतात. सन २००४मध्ये सुमात्रा बेटाजवळ झालेल्या ९.१ रिश्टर क्षमतेच्या विनाशकारीभूकंपाने तब्बल २.३० लाख लोकांचा मृत्यू झाला आणि त्सुनामी लाटांचा तडाखा आजूबाजूच्या १२ देशांना बसला होता. (वृत्तसंस्था)प्रथमच बाजार भरलाबेटावर सर्वाधिक हानी झालेल्या जिल्ह्यांमध्ये तान्जुंगचा समावेश होतो. शनिवारी तेथे प्रथमच बाजार भरला आणि पार विस्कोट झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळाले.
इंडोनेशियाचे बेट भूकंपाने १० इंच आले वर! प्रचंड विनाश; ४०० मृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 4:03 AM