शास्त्रज्ञांचा दावा : जमीन दहा फूट वर ढकलली गेलीवॉशिंग्टन : शनिवारी नेपाळला बसलेल्या ७.९ मॅग्निट्यूडच्या भूकंपात भारतालाही जबर धक्का बसला असून, काही क्षणांत भारताचा भूभाग १० फूट उत्तरेकडे सरकला असल्याचे अमेरिकन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारचा भूकंप झाल्यानंतर काही क्षणांत काठमांडू ते पोखरा यासह १ हजार ते २ हजार चौ. मैलाचा भूभाग एका दिशेने सरकला व हिमालयासह हिमालयाच्या रुंदीचा तेवढाच भूभाग दुसऱ्या दिशेने सरकला, असे कोलंबिया विद्यापीठाच्या लॅमाँट - डोहर्थी अर्थ आॅब्झर्वेटरीचे संशोधक सहायक प्रोफेसर कोलीन स्टार्क यांनी म्हटले आहे. क्रस्ट या नावाने ओळखला जाणारा हा खडक (लिथोस्पिअर) बिहार ते भरतपूर, हेतुदा व जनकपूर हा भाग नेपाळच्या दिशेला सरकला, असे स्टार्क यांनी सांगितले. उत्तर भारत नेपाळजवळ सरकत असून, ही प्रक्रिया कायम सुरू आहे, असेही स्टार्क म्हणाले. पृथ्वीचे प्रतल (प्लेट्स) कसे सरकत आहेत याकडे भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष आहे. संपूर्ण भारतीय उपखंड दरवर्षी १.८ इंच गतीने नेपाळ व तिबेटखाली सरकत आहे, असे स्टार्क यांनी सीएनएन वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. दहा लाख वर्षांपूर्वी अशाच प्रक्रियेतून उत्तुंग अशा हिमालयाचा जन्म झाला असून, पाकिस्तान ते म्यानमार हा प्रदेश भूकंपप्रवण बनला आहे, असे स्टार्क यांनी म्हटले आहे. शनिवारचा भूकंप अनपेक्षित वा अकल्पित नव्हता. १० जणांचा बळी घेणाऱ्या १९३४च्या बिहार भूकंपानंतर भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) नेपाळच्या प्रतलात १२ फूट घुसला आहे. त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा बाहेर पडली इतकेच. हिमालय कोपला!मदतीसाठी कार्यकर्ते दुर्गम भागात पोहोचण्यासाठी धडपडत असून, या भागातील मृतांची संख्या कळल्यानंतर मृतांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त होईल, असे नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी म्हटले आहे. भूकंपाचा तडाखा ८० लाख लोकांना बसल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. एव्हरेस्टची उंची कायम एव्हरेस्ट शिखर थेट फॉल्ट लाइनवर नसल्याने एव्हरेस्टवर फार परिणाम झाला नाही. कोसळलेल्या दरडीने शिखरावरील बर्फाचा थर खाली आणला असता तर कदाचित एव्हरेस्टची उंची कमी झाली असती. काठमांडू दक्षिणेकडे सरकलेच्नेपाळला बसलेल्या भीषण भूकंपाच्या धक्क्याने नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडू शहराची जमीन सरकली असून, काठमांडू शहर ३ मीटर दक्षिणेकडे सरकले आहे; पण लगतच्या माऊंट एव्हरेस्टची उंची मात्र कायम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. च्हा भूकंप हिमालयातील दोन प्रतल एकत्र येण्याच्या (थ्रस्ट फॉल्ट) जागी झाला असावा. भारतीय उपखंड व युरेशिया यांचे प्रतल हिमालयातील थ्रस्ट फॉल्टवर वेगळे होतात. च्हा थ्रस्ट फॉल्ट १० अंश उत्तरेकडे सरकला असून, यामुळे काठमांडू शहर ३ मीटरने दक्षिणेकडे सरकले आहे. हा फॉल्ट दोन प्रतलांमध्ये आहे. यातील एक प्रतल भारताचा असून, दुसरा युरोपचा आहे. भारताचा प्रतल युरोपच्या प्रतलाला उत्तरेकडे ढकलत आहे.
भूकंपाने भारत उत्तरेकडे सरकला
By admin | Published: April 29, 2015 2:21 AM