Earthquake In Pakistan : गुरूवारी सकाळी पाकिस्तानातभूकंपाचा मोठा धक्का जाणवला. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हरनईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एएनआयनं एफपीच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार पाकिस्तानच्या हरनाईमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास रिश्टर स्केलवर (Richter scale) ६.० तीव्रतेचा (Pakistan Earthquake) भूकंप आला. यामध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण पाकिस्तानातील आपात्किल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला. "यामध्ये १५ ते २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे," असं बलुचिस्तानच्या आपात्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखांनी एफपीशी बोलताना सांगितलं. दरम्यान, सोशल मीडियावरही काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरणही पसरल्याचं दिसून येत आहे.