पाकिस्तानमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. इस्लामाबाद परिसरात भुकंपाचे केंद्र असले तरी जम्मू काश्मीरपर्यंतची जमीन हादरली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी होती.
अद्याप कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त आलेले नाही. घरे थरथरू लागल्याने इमारतीमधून लोक बाहेर पडले. नुकतेच थायलंड आणि मान्यमारमध्ये भूकंप झाल्याने तेथील दृष्ये पाहून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
पृथ्वीच्या आत ७ प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत राहतात. या प्लेट जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा धरणी कंप पावू लागते. वारंवार होणाऱ्या टक्करमुळे या प्लेट्सचे कोण वाकू लागतात. यामुळे दबाव निर्माण होतो, त्याखालील ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. या दबावातून भुकंपाचे हादरे बसू लागतात.
भूकंप कधी आणि किती विनाश करतो?
रिश्टर स्केल प्रभाव० ते १.९ हे फक्त भूकंपमापक यंत्राद्वारे शोधता येते.२ ते २.९ सौम्य हादरे.३ ते ३.९ ही धडक तुमच्या जवळून जाणाऱ्या ट्रकसारखी आहे.४ ते ४.९ खिडक्या तुटू शकतात. भिंतींवर लटकलेल्या फ्रेम्स पडू शकतात.५ ते ५.९ फर्निचर हलू शकते.६ ते ६.९: इमारतींच्या पायांना तडे जाऊ शकतात. वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.७ ते ७.९ इमारती कोसळतात. जमिनीखाली पाईप फुटतात.८ ते ८.९ प्रमुख पूल आणि इमारती कोसळतात. समुद्राजवळील भागात त्सुनामीचा धोका.९ आणि त्यावरील म्हणजे संपूर्ण विध्वंस. जर कोणी शेतात उभा राहिला तर त्याला पृथ्वी हलताना दिसेल. जर समुद्र जवळ असेल तर त्सुनामी शक्य आहे.