ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 18 - रशियामधील कमचटका पेनिसुला येथे शक्तिशाली भूकंप झाला आहे. आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू बर्निंग आयलँडपासून 200 किलोमीटर लांब असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची भीती असून तसा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर बातम्या
मंगळवारी सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी निकोल्सकोय शहरापासून जवळपास 200 किमी दूर अंतरावर असलेल्या कमचटका पेनिसुला आयर्लॅडवर भूकंप आला होता. भूकंपाची व्याप्ती खूप कमी होती. हा भूकंप प्रचंड धोकादायक होता. मात्र भूकंप शहरापासून लांब झाला, तसंच याठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही आहे. यामुळेच सुदैवाने कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याची माहिती मिळाली आहे.
भूकंपाचा धोका टळला असला तरी त्सुनामी येण्याची शक्यता आहे. तसा अलर्टच जारी करण्यात आला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात आत असल्याने त्यामुळे निकोल्सकोय किनाऱ्यावर 1-2 फुटाच्या लाटा निर्माण होतील, असं सांगण्यात येत आहे. रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने, उंच लाटा येण्याची भीती व्यक्त केली असून या निकोल्सकोयमध्ये पोहोचू शकतात असं सांगितलं आहे.
अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी सेंटरने चेतावणी दिली आहे की, "समुद्रतटापासून 300 किमी अंतरावर त्सुनामीच्या धोकादायक लाटा उसळू शकतात". मात्र नंतर त्यांनी हा धोका कमी झाल्याचंही सांगितलं आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्व्हे आणि अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी सेंटरने मात्र आता धोका कमी झाला असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे रशियाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सावधगिरीची सर्व उपाययोजना केल्या आहेत. सोबतच समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.