वॉशिंग्टन : रशियाच्या पूर्व किनाऱ्याला ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने म्हटले आहे. यात जीवित वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. या धक्क्यामुळे प्रशांत महासागराच्या काही भागात त्सुनामीची शक्यता असल्याचा इशाराही विभागाने दिला होता. नंतर हा इशारा पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने मागे घेतला. भूकंपाचे केंद्र रशियाच्या पूर्व-आग्नेय दिशेला १९९ किलोमीटरवर ११.७ किलोमीटर खोलीवर होते.
रशियाला भूकंपाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:02 AM