ऑनलाइन लोकमतइटली, दि. २५ : इटलीत बुधवारी पहाटे झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृत्यूचा आकडा वाढून २४७ वर गेला आहे. ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात ३६८ नागरिक जखमी झाले आहेत. तसंच अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून, कित्येक बेपत्ता आहेत, असे आपत्कालीन विभागाचे प्रमुख इम्माकोलाटा पोस्टीगलायने यांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर्सबर्गमधील आपला साप्ताहिक कार्यक्रम रद्द करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
उम्ब्रिया, मारचे आणि लाजियो बुरीदरम्यान विस्तारलेल्या दुर्गम भागात सर्वाधिक विध्वंस घडून आला असून, भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. एमाट्रिस, एकुमोली आणि अरकाटा डेल टोरँटो या गावात आणि लगतच्या परिसरात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे.
इटालीत झालेल्या तीव्र भूकंपामुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली असून, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. कित्येक जण बेपत्ता आहेत. भूकंपग्रस्त भागातील मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान मॅट्टीओ रेन्झी यांनी त्यांचा नियोजित फ्रान्स दौरा रद्द केला आहे.
यापूर्वी इटलीमध्ये २००९ साली भयंकर भूकंप झाला होता, त्या वेळी ३०० जणांचा मृत्यू झाला होता. अनेक नागरिकांना त्या भीषण भूकंपाची या वेळी आठवण झाली.
Latest photos from Italy's #earthquake zone, where at least 247 people were killed https://t.co/jmCAoDVY5hpic.twitter.com/JxyRFAfNo5— Bloomberg (@business) August 25, 2016