या भूकंपानंतर नेपाळकडे जाणारी सर्व विमाने भारताच्या दिशेन वळवण्यात आली आहेत.
काठमांडू येथल्या ऐतिहासिक वास्तुंसह अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
भारतात दिल्ली शहरात भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जाणवली भूकंपामुळे तीन ते चार मिनिटापर्यंत दिल्लीतील घरे व कार्यालयांचा परिसर हादरत होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार व सिक्किम या राज्यांतील मुख्यमंत्र्यांसह नेपाळच्या पंतप्रधानांशी संपर्क साधला असून संकटनिवारणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
या भूकंपामध्ये सगळ्यात जास्त नुकसान नेपाळमध्ये झाले असून शेकडोजण जखमी झाल्याची तसेच काहीजण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८१ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आली आहे.
धराहरा किंवा भीमसेन टॉवर भूकंपामध्ये जमीनदोस्त झाला. नेपाळचे पंतप्रधान भीमसेन थापा यांनी 1832 साली हा टॉवर बांधला होता. 9 मजले असलेल्या या टॉवरची उंची 61.88 मीटर होती आणि वर्तुळाकार 213 पाय-या होत्या.
जमीनदोस्त होण्यापूर्वीचा धराहरा किंवा भीमसेन टॉवर. आठव्या मजल्यावरून पर्यटकांना काठमांडू व्हॅलीचे दृष्य बघण्याची सोय होती.
नेपाळसह उत्तर भारतात शनिवारी 25 एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 1934 नंतर प्रथमच इतका भयप्रद भूकंप नेपाळमध्ये झाला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. (सर्व फोटो Twitter च्या माध्यमातून घेतले आहेत)