ऑनलाइन लोकमत
तुर्की, दि. 28 - पश्चिम तुर्कीला भारतीय प्रमाण वेळ मंगळवारी रात्री ११.४१ वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४ तीव्रता असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ७ कि.मी. खोल होता. डेनिझ्ली पामुक्काले या शहरांना भूकंपाचा फटका बसला. इसमिर या शहरातही भूकंपाची कंपने जाणवली. तुर्कीच्या वेळेप्रमाणे रात्री ९.११ वाजता भूकपांचा धक्का बसला.