शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बोलताना शब्द खाता? मल्टी टास्किंग थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 10:00 AM

एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे.

रोज आपण किती काम करतो? एका मागोमाग कामांचा रगाडा सुरूच असतो. हे झालं की ते. ते झालं की हे अनेकदा अनेक जण तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं करत असतात. यालाच आपण मल्टी टास्किंग म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं, एका दिवसात ४८ तास असते किंवा दिवस मोठा असता तर किती बरं झालं असतं. अलीकडच्या काळात तर आपलं काम आणि घरगुती जीवन यातील सीमारेषाही कल्पनेपलीकडे अस्पष्ट झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरासाठी झटतो आहोत की आपल्या ऑफिससाठी, कार्यालयासाठी हे समजणंही मुश्कील झालं आहे.

एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे. मल्टी टास्किंग आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक जण ते करतच असतो. आजच्या रिमोट वर्कच्या स्पर्धेच्या आणि स्वतःला कायम सिद्ध करत राहाण्याच्या काळात ते जास्तच आवश्यक झालं आहे. मल्टी टास्किंगमुळे एकाच वेळी अनेक कामं आपण पूर्ण करीत आहोत, आपला 'बॅकलॉग' आपण झपाट्यानं पूर्ण करीत आहोत, असा भास आपल्याला सतत होत राहतो, पण ते खरं नाही.

मुळात मल्टी टास्किंग ही गोष्टच वास्तविक नाही. असं केल्यामुळे खरं तर तुम्ही फक्त आपल्या कामांचा प्राधान्यक्रम मागेपुढे करीत असता. यापेक्षा जास्त काही त्यातून साध्य होत नाही. खरंतर एकच काम जेव्हा तुम्ही पूर्ण सजगतेनं आणि कार्यक्षमतेनं करता, तेव्हा ते अधिक चांगलं होतं, त्यातून मिळणारं समाधानही जास्त असतं. मात्र, एकाच वेळी जास्त कामांची शारीरिक आणि मानसिक ओझी तुम्ही वाहत असाल तर बहुदा प्रत्येक काम तुम्ही कमी कार्यक्षमतेनं करता त्याला अधिक वेळ लागतो आणि ते थोडं कमअस्सल होण्याची शक्यताही जास्त असते. याशिवाय तुम्ही तुमचं मानसिक आरोग्यही पणाला लावत असता, त्याला हानी पोहोचवत असता.जगात फारतर दोन ते अडीच टक्के लोकच असे असतील, असू शकतात, जे खरंच मल्टी टास्किंग करू शकतात, बाकीच्यांनी मात्र यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचाच अधिक गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्यासाठी पर्यायी चांगले मार्ग धुंडाळले पाहिजेत.तुम्ही जर मल्टी टास्किंगच्या मागे लागला असाल, तर थोडं थांबा. आपला स्पीड कमी करा. एका वेळी शक्यतो एकाच गोष्टीवर फोकस करा आणि मग पुन्हा कामाला लागा. यासंदर्भात नुकतंच एक व्यापक संशोधन झालं आहे आणि त्यावर मल्टी टास्किंगच्या दुष्परिणामांवर गांभीर्यानं सजग करण्यात आलं आहे.

आपण आपली नेहेमीची कामं करतच असतो, पण कधीकधी अचानक आपल्याला समोरच्या परिचयाच्या व्यक्तीचंही नावच आठवेनासं होतं, आपला फोन कुठे ठेवला ते लक्षात राहात नाही, आपल्या चाव्या आपण कुठेतरी ठेवून देतो आणि मग त्या शोधत बसतो, चष्मा सापडला नाही की चिडचिड करतो, बोलताना मध्येच काही शब्द खाल्ले जातात, ऑनलाइन बिल भरण्यासाठी मोबाइल तर हातात घेतो, पण आपल्याला काय करायचं होतं, तेच विसरून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत या गोष्टी होतात आणि ते 'नॉर्मल'ही आहे. पण हे जर वारंवार घडायला लागलं, तर मात्र समजायचं, काही तरी गडबड आहे. मेंदूच्या संदर्भातील आजाराचा हा संकेत असू शकतो आणि काही वेळा ते गंभीरही असू शकतं..

जमेल की, फार अवघड नाही ते!मल्टी टास्किंगची आपल्याला सवय असेल तर ती लगेच मोडता येणार नाही, पण थोडे प्रयत्न केले तर त्यापासून नक्कीच लांब राहता येऊ शकतं. एकाच वेळी अनेक कामं करीत असला, तर आधी आपला अॅप्रोच बदला. एक यादी करा. प्राधान्यक्रमानुसार सर्वांत महत्त्वाचं काम आधी करा. ते झालं की दुसऱ्या कामाला हात लावा. आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा, माइंडफुलनेसचा वापर करा आणि मनातला तसंच आजूबाजूचा कचारा, गोंधळ कमी करा.....

अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्यान्यूरोसायकॉलॉजिस्ट एलिस कॅकापोला यासंदर्भात आपल्याला सजग करताना सांगतात, थांबा आता जरा. मल्टी टास्किंग थोडं बाजूला ठेवा. आपण जेव्हा कोणतंही काम करीत असतो, तेव्हा मेंदूशी संबंधित अनेक नेटवर्क क्रियाशील असतात, पण मल्टी टास्किंगमध्ये या नेटवर्कमध्येच गडबड होऊन स्मरणशक्ती आजारी पडू शकते. मल्टी टास्किंगमुळे विशेषतः आपल्या मानसिक आरोग्यावर पाच प्रकारचे दुष्परिणाम होतात. मेंदूच्या कार्याशी तडजोड व्हायला सुरुवात होते, आपल्याला सातत्यानं तणाव जाणवायला लागतो, त्यामुळे नैराश्य येऊ शकतं, आपली प्रेरणाशक्ती कमजोर होऊ शकते आणि स्मरणशक्ती दगा देऊ शकते.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी