शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

इबोला प्रतिबंधक लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी

By admin | Published: November 05, 2014 1:09 AM

पश्चिम आफ्रिकेतील पाच देशांमध्ये १० हजारांहून अधिक बळी घेतलेल्या व अमेरिका आणि युरोपने धास्ती घेतलेल्या इबोला या अत्यंत प्राणघातक रोगावरील, नाकाने हुंगता येईल

वॉशिंग्टन : पश्चिम आफ्रिकेतील पाच देशांमध्ये १० हजारांहून अधिक बळी घेतलेल्या व अमेरिका आणि युरोपने धास्ती घेतलेल्या इबोला या अत्यंत प्राणघातक रोगावरील, नाकाने हुंगता येईल अशा, जगातील पहिल्या प्रतिबंधक लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या खूपच यशस्वी ठरल्या असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.टेक्सास विद्यापीठात अशी लस विकसित करण्याचे संशोधन सुरु असून या लसीचे मानवाखेरीज अन्य वानरवर्गीय प्राण्यांवर प्रयोग केले असता त्याने इबोलाच्या विषाणूंची लागण होण्यापासून दीर्घकाळ संरक्षण मिळू शकते, असे निष्कर्ष दिसून आले आहेत. अमेरिकेच्या विन्नीपेग येथील नॅशनल मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीच्या प्रा. मारिया क्रॉयले व डॉ. गॅरी कॉबिंगर या नव्या लसीच्या चाचण्यांसंबंधीची अधिकृत घोषणा बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. प्रा. क्रॉयले व त्यांचा वैज्ञानिकांचा चमू या लसीचे नाकाने हुंगता येईल असे संमिश्रण विकसित करण्यावर गेली सात वर्षे काम करीत आहे. या लसीचे मानवेतर वानरवर्गीय प्राण्यांवर प्रयोग केले असता त्यांना इबोला झैरे १५० प्रजातीच्या विषाणूंच्या संपर्कात येऊनही त्याची लागण होण्यापासून संरक्षण मिळण्याचे प्रमाण ७६ ते १०० टक्के असल्याचे दिसून आले आहे. हे यश विशेष लक्षणीय मानले जात आहे, कारण याआधी हीच लस इंजेक्शनच्या स्वरूपात दिलेल्या वानरवर्गीय प्राण्यांना इबोलाची लागण होण्यापासून मिळू शकणारे संरक्षण ५० टक्क्यांपर्यंतच असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रा. क्रॉयले यांच्या संशोधनाचा पुढचा टप्पा हीच लस माणसांसाठी वापरून त्यांच्या चिकित्साविषयक चाचण्या घेण्याची असेल. याशिवाय हीच लस अत्यंत पातळ पापुद्र्याच्या स्वरूपात जिभेखाली ठेवून देणे शक्य आहे का याच्या वानरवर्गीय प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे हे कामही त्यांना करायचे आहे. (वृत्तसंस्था)