वॉशिंग्टन : ‘कोविड-१९’ या रोगाने घातलेल्या थैमानामुळे बहुतेक सर्व देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. जगातील आर्थिक महासत्ता असलेली अमेरिकादेखील याला अपवाद नाही. तेथे तब्बल ४.३ कोटी नागरिक बेरोजगार झाले आहेत. महामारीच्या काळात या देशातील टोकाची आर्थिक विषमता दर्शविणारी दुसरी बाजू समोर आली आहे. अमेरिकेतील कोट्यवधी नागरिक बेरोजगार झाले असतानाच अब्जाधीशांच्या यादीत तब्बल ५६५ बिलियन डॉलर्सची मोठी भर पडली आहे.
‘इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिसी स्टडीज’तर्फे(आयपीएस) ‘बिलियनर बोनान्झा २०२०’ हा अहवाल तयार करण्यात आला आहे. चक कॉलिन्स, ओमर ओकाम्पो आणि सोफिया पलास्की यांनी महामारीच्या काळातील म्हणजे साधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच्या अब्जोपतींच्या संपत्तीचा अभ्यास केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत अमेरिकेतील अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत १९ टक्के वाढ होऊ ती ३.५ ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यापासून आतापर्यंत ४.३ कोटी अमेरिकन नागरिकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे. यात भर म्हणजे, परिवहन, सेवा, पर्यटन यांसारख्या क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या गटातील अनेक कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा फटका बसला आहे. दुसरीकडे, १८ मार्चपासून अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेनॉझ यांची संपत्तीत ३६.२ बिलियन डॉलर्सची भर पडली. हे आकडे अमेरिकेतील विषमतेची दरी किती भयंकर आहे, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. येत्या काळात ही आर्थिक विषमता२भयंकर रूप धारण करू शकते, अशी भीती अर्थतज्ज्ञांना वाटते....हे तर अर्थव्यवस्थाआणखी वाईट होण्याचे लक्षणअमेरिकेत संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असतानाच तेथील शेअर मार्केटवर मात्र याचा परिणाम झालेला नाही. उलट ते तेजीत आहे. त्यावर साहजिकच अमेरिकेतील श्रीमंतांचे वर्चस्व आहे. या संकटाच्या काळातही शेअर मार्केट जोरात आहे. एकंदरित अर्थव्यवस्था अडचणीत असतानाच शेअर मार्केट मात्र काही पटीने वाढणे हे आर्थिक स्थिती आणखी वाईट होण्याचे लक्षण आहे, असे निरीक्षण एका मोठ्या कंपनीतील मुख्य ग्लोबल मार्केट अॅनालिस्ट ख्रिस्तिना हूपर यांनी नोंदविले. (वृत्तसंस्था)असे अब्जाधीश... अशी वाढच्मार्चच्या मध्यातील स्थितीचा विचार करता अमेरिकेतील शेअर बाजारात अॅमेझॉनचे मूल्य तब्बल ४७ टक्क्यांनी वाढले आहे. फेसबुकचा सहसंस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत ३०.१ बिलयन डॉलर्सची वाढ झाली आहे. टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क, गुगलचे संस्थापक सर्जेई ब्रिन आणि लॅरी पेज, मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बॉल्मर या सर्वांच्या संपत्तीत प्रत्येकी किमान १३ बिलियन डॉलरची भर पडली.