शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

दहशतवाद्यांना आर्थिक रसद; हाफीजसह १३ जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 5:05 AM

फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले होते.

इस्लामाबाद : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात-उद-दावाचा (जेयूडी) प्रमुख हाफीज सईद व त्याच्या १२ साथीदारांवर दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या व मनी लाँड्रिंगच्या विविध प्रकरणांत पाकिस्तानी तपास यंत्रणांनी गुन्हे दाखल केले आहेत. हाफीज सईदने हा पैसा आपल्या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गोळा केला होता. त्याला लवकरच अटक होईल, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, जमात-उद-दावाच्या १३ नेत्यांविरोधात २३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद तोडण्यासाठी पाकिस्तान ठोस पावले उचलत नसल्याबद्दल अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व आणखी काही महत्त्वाच्या देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तशी कारवाई करावी म्हणून या देशांनी पाकिस्तानवर दबाव आणला होता.फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले होते. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा व मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी पाकिस्तानमधील कायदे अपुरे आहेत. दहशतवाद्यांना मिळणारे पैशाचे पाठबळ पूर्णपणे थांबविण्यासाठी पाकिस्तानने आॅक्टोबरपर्यंत कारवाई पूर्ण करावी; अन्यथा परिणामांना सामोरे जावे, अशी ताकीद एफएटीएफने दिली होती. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया पूर्णपणे बंद होतील याकडेही पाकिस्तानने लक्ष द्यावे असेही एफटीएफने म्हटले होते.संबंध ताणलेलेचअल्् अनफाल ट्रस्ट, दावत उल इर्शाद ट्रस्ट, मौज बिन जबल ट्रस्ट आदी धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून पैसा गोळा करून मालमत्ता विकत घेण्यात आली. या उलाढालीतून येणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरविण्याचे काम हाफीज सईद व त्याचे साथीदार करीत होते.- जमात-उद-दावाच्या मुख्यालयाला मार्च महिन्यामध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सील ठोकले, तसेच १२० संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा बंद केली असून, दोन्ही देशांतील संबंध ताणलेलेच आहेत.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान