शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ट्रम्प यांच्या 'टेरिफ टेररिझम'मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय, रामदेवबाबा यांनी केली टीका

By संदीप आडनाईक | Updated: March 8, 2025 17:59 IST

कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातील नेत्यांना बोलावून ते त्यांना अपमानास्पद वागणूक ...

कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातील नेत्यांना बोलावून ते त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यांच्या 'टेरिफ टेररिझम'मुळे जगभरात आर्थिक दहशतवाद वाढतोय अशी टीका योगगुरु रामदेवबाबा यांनी शनिवारी केली.महिला पतंजली योग समितीतर्फे कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय महिला महासंमेलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ट्रम्प यांच्यासह जगभरातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीत ट्रम्प केव्हा काय निर्णय घेईल यावर जगभरात गोंधळ माजतो. ते एकीकडे बोलून दाखवत कृती करताहेत, मात्र शी जिनपिंग तर न बोलताच थेट कृती करत आहेत हे जास्त चिंताजनक आहे. पुतीन काही बोलत नाहीत, काही विधान करत नाहीत, ते थेट कारवाई करताहेत आणि किम जोंग काय करेल हे सांगताच येत नाही अशाप्रकारचे राजकीय दहशतवादाचे वातावरण जगभरात आहे, अशी टीका रामदेवबाबा यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, यामध्ये भारत एकमेव असा देश आहे, जो दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण कधी करत नाही. परंतु देशाला स्वयंशक्तीशाली बनणे गरजेचे झाले आहे. आत्मसन्मानाची लढाई देशाला स्वत:ला लढावी लागणार आहे.

ट्रम्पसारखा कलंकित माणूस बनू नका..ट्रम्पमुळे न्याय पायदळी तुडवला जात आहे. मानवतावाद आणि अध्यात्म याच्या जोरावर केवळ सशक्त भारतच तोडीस तोड उत्तर देउ शकेल. भारतीय भूमीत सन्मान आणि अधात्म्य यांची ताकद आहे. त्यासाठी देशवाशियांनी एकजूट करण्याची गरज आहे. इथली महिला शक्ती ईश्वराचा अंश आहे. तिच्या सन्मानासाठी पतंजलीने देशभर ५० लाख महिलांचे एकत्रिकरण करण्याचे ठरवले आहे. उपाय जे सांगणार नाहीत तेच खरे समस्या बनत आहेत. योगामुळे चांगला माणूस घडेल, ट्रम्पसारखा कलंकित आणि मानवतेला काळीमा फासणारा माणूस न बनवण्याचे आव्हान जगासमोर आहे, ते योगशक्तीमुळे साध्य होईल असे रामदेव बाबा म्हणाले.

राजकारणात जाणार नाहीराजकारणात प्रवेश करणार काय या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सत्ताशासनात कशासाठी जाउ, मी आत्मशासनात संतुष्ट आहे असे रामदेवबाबा म्हणाले. कोल्हापुरचा जीडीपी राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा आहे, तो लवकरच वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. लवकरच ते घडेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पEconomyअर्थव्यवस्थाBaba Ramdevरामदेव बाबा