ऑनलाइन लोकमत -
कैरो, दि. २९ - अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या विमानाचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली आहे. इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे. इजिप्त एअरने ट्विटरवरुन विमानाचं अपहरण झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या विमानाने सकाळी उड्डाण केले असता अचानक सायप्रस येथील विमानतळावर एमर्जन्सी लँडींग करण्याची विनंती केली.
अपहरणकर्त्यांनी 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विमानात एकूण 55 प्रवासी आणि 7 क्रू मेम्बर्स आहेत. अपहरण करुन विमानाचं सायप्रस येथील विमानतळावर लॅडींग करण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. विमानात एक अपहरणकर्ता असून तो आत्मघाती हल्लेखोर असण्याची शक्यता आहे, तसंच विमानात बॉम्ब असण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. अपहरणकर्त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही मागणी केलेली नाही. बचावकार्य पथकांना एअरपोर्टच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.
इजिप्त एअरच्या अपहरण झालेल्या विमानात 8 ब्रिटीश आणि 10 अमेरिकन नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरणकर्त्यांनी केबिन क्रू आणि पाच परदेशी नागरिक वगळता सर्व प्रवाशांची सुटका केली असल्याची माहिती इजिप्त एअरने दिली आहे.
Our flight MS181 is officially hijacked. we'll publish an official statement now. #Egyptair— EGYPTAIR (@EGYPTAIR) March 29, 2016