शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

ईद नमाजींवर हल्ला !

By admin | Published: July 08, 2016 5:02 AM

१ जुलैच्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा बांगलादेश कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्याने हादरला. ईदनिमित्त किशोरगंज जिल्ह्यातील शोलकिया

ढाका : १ जुलैच्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा बांगलादेश कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्याने हादरला. ईदनिमित्त किशोरगंज जिल्ह्यातील शोलकिया येथे दोन लाखांहून अधिक लोक नमाज पढत असताना दहशतवाद्यांनी तिथे बॉम्ब फेकून बेछूट गोळीबारही केला. बॉम्बस्फोटानंतर पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीने हा परिसर थरारला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह चार जण ठार झाले, तर पोलिसांनी एका दहतवाद्याचा खात्मा केला.बांगलादेशातील शोलकिया येथे ईदच्या प्रार्थनेसाठी जवळपास २० हजार लोक जमले होते. या प्रार्थनास्थळानजीकच हा हल्ला करण्यात आला. दोन पोलीस ठार, तर अन्य १३ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असताना एक गोळी झरनाराणी भौमिक या हिंदू महिलेला लागली आणि तीही मरण पावली. बॉम्बहल्ला झाल्याचे कळताच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शिताफीने या परिसराची नाकेबंदी करून मोर्चा सांभाळत हल्लेखोरांशी मुकाबला केला.दोन संशयित हल्लेखोर जेरबंददोन संशयित हल्लेखोरांना जेरबंद करण्यात आले असून, १३ जण जखमी झाले आहेत. अतिरेक्यांना पकडण्यासाठी आसपासच्या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे किशोरगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबू सायेम यांनी सांगितले. सहा ते सात सशस्त्र हल्लेखोरांनी पोलिसांवर एकदम हल्ला केला. हे पोलीस प्रार्थनास्थळी जाणाऱ्या लोकांची तपासणी करीत होते. नमाजाच्या ठिकाणाच्या जवळच फेकण्यात आलेला बॉम्ब गावठी होता, असा प्राथमिक अंदाज आहे. एनएसजी पथक बांगलादेशला जाणार नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) एक पथक शुक्रवारी बांगलादेशला रवाना होणार आहे. ढाक्यात एका रेस्टॉरंटमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यास आणि विश्लेषण करण्यास हे पथक जाणार आहे. या पथकात अतिरेकी विरोधी अभियानातील एनएसजीच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. ‘ते’ मानवतेचे दुश्मन - शेख हसीनाईदच्या प्रार्थनेच्या वेळी हल्ला करणारे मानवतेचे दुश्मन आहेत, असे पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे. ढाक्यातील रेस्टॉरंटवर हल्ला करणारे युवक काही महिन्यांपासून बेपत्ता होते. तेव्हा पालक आणि शाळांनी बेपत्ता मुलांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा शोध घेतला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचारही केले जातील.