ओहोयो : लहान मुलांना मोबाईल फोनचे जणू वेड लागले आहे. जवळपास सगळ््याच घरांत हीच परिस्थिती आहे. जर तुमचा मुलगा मोबाईलवर व्हिडिओ बघत असेल तर सावध व्हा.आठ वर्षांच्या मुलाने युट्यूबवर कार चालवणे शिकून घेतले. वाहतुकीचे नियम माहिती करून घेण्यासाठी त्याने व्हिडिओदेखील बघितले. एके दिवशी त्याने त्याचे आई-वडील झोपलेले असताना कार काढली. आपल्या चार वर्षांच्या बहिणीला कारमध्ये बसवून अर्ध्या तासाची ड्रायव्हिंग करून बर्गर घेण्यासाठी तो रेस्टॉरंटमध्ये गेला. तेथे लोकांनी त्याला बघून पोलिसांना बोलावले. त्याच्या पालकांना कळवण्यात आले. नंतर त्याच्या ड्रायव्हिंगमुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल.
आठ वर्षांच्या मुलाने केली कार ड्रायव्हिंग
By admin | Published: April 15, 2017 1:22 AM