ढाका - बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर तिथल्या हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. देशभरातील हिंदू समुदायांच्या घरांना, मंदिरांना टार्गेट करून हल्ले केले जातायेत. बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होईल अशी भीती व्यक्त करतायेत. तर स्वत:ला इस्लामी विद्वान सांगणारे अबू नज्म फर्नांडो बिन अल इस्कंदरने बांगलादेशातून हिंदूंना पूर्णपणे संपवून टाका असं आवाहन केले आहे. त्यांनी इस्लामी कायद्याचा हवाला देत हिंदूकडे केवळ २ पर्याय आहेत ज्यात पहिला पर्याय मृत्यू आहे.
पीएचडीचा अभ्यास करणारे अल इस्कंदरने ट्विटमध्ये म्हटलंय की, अहल-ए-सुन्ना इस्लामिक न्यायशास्त्राच्या चारपैकी तीन विचारानुसार, हिंदूंना फक्त दोनच पर्याय असायला हवेत, हे जाणून मला दिलासा मिळाला. प्रथम तलवार स्वीकारा आणि दुसरा इस्लामचा स्वीकार करा. हिंदूंनी आभार मानले पाहिजे की ते सध्या हनफीचा सामना करत आहेत, ना मलिकी,ना शफी किंवा ना हनबलीशी नाही.हे सर्व सुन्नी मुस्लिमांमधील मुस्लिम कायद्याच्या या चार प्रमुख विचारधारा आहेत असं विष त्यांनी ओकलं आहे.
त्याचसोबत मुस्लिमांपासून वेगळे दिसण्यासाठी त्यांनी डोक्याच्या पुढील बाजूचे केस मुंडण केले पाहिजेत. मुस्लिमांपेक्षा कमी दर्जाचे असल्यामुळे गैर-मुस्लिमांना कसे अपमानास्पद वागणूक मिळावी, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा असंही सौदी अरेबिया आणि कतारमधील प्रमुख सुन्नी हनबली इस्लामिक कायद्याचा हवाला देत अल इस्कंदरने म्हटलं आहे.
दरम्यान, जे हिंदू मुस्लीम देशांमध्ये राहतात, त्यांच्यापेक्षा खाली राहणे स्वीकारतात त्यांना काही अडचण नाही. ते त्यांच्या धर्माचा शिर्क (मूर्तिपूजा, बहुदेववाद) सोडून इस्लामिक कायदे आणि नियमांनुसार जगावं. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे हिंदू प्रोपेगेंडा आहे. बांगलादेश हिंदू प्रभाव आणि हस्तक्षेपापासून मुक्त होईल अशी आशा व्यक्त करत स्वत:ला उदारमतवादी दाखवण्याचा प्रयत्न अल इस्कंदर यांनी केला आहे.