काबूल : अफगाणिस्तानमध्ये निवडणूक निकालावरून उद्भवलेले राजकीय संकट दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत आहे. या पाश्र्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या अफगाण दौ:यास शुक्रवारी प्रारंभ झाला. सध्याचे राजकीय संकट देशाच्या भविष्याला धोक्यात टाकू शकते, असा इशारा केरी यांनी दिला.
राजधानी काबूल येथील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील अमेरिकी दूतावासात संयुक्त राष्ट्र मदत मिशनचे प्रमुख जॉन क्युबिस यांच्याशी त्यांनी बातचीत केली. ‘अफगाणिस्तानबाबत आम्ही एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचलो आहोत. भविष्यातील परिवर्तन अधांतरी आहे. यामुळे आमच्याकडे करण्यासारखे खूप काही आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. केरी यांचा हा दौरा अचानकपणो ठरल्याने ते भल्या पहाटेच काबूलमध्ये दाखल झाले.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुस:या टप्प्यातील उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला आणि अशरफ गणी यांच्याशी ते शुक्रवारी बातचीत करतील. मावळते राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचा उत्तराधिकारी निवडीसाठी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीवरून दोन्ही उमेदवारांत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. यामुळे नव्या राष्ट्राध्यक्षांसमोर अनेक आव्हाने निर्माण होण्याचा धोका आहे. उभय उमेदवारांकडून परस्परांवर निवडणुकीत अफरातफर केल्याचा आरोप होत आहे. पहिल्या टप्प्यात आघाडीवर असणा:या अब्दुल्ला अब्दुल्ला यांना मागे टाकत दुस:या फेरीत अशरफ गणी यांनी आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)
मात्र, अब्दुल्ला हे स्वत:ला खरा विजेता म्हणून घोषित करत अफरातफरीमुळे दणदणीत विजयाला आपण मुकल्याचे सांगत आहेत.अफगाण नागरिकांमधील प्रश्नांना उत्तर मिळेल, त्यांच्या शंका दूर होतील असा तोडगा निघेल, अशी आशा केरी यांनी व्यक्त केली.
4निवडणूक वादामुळे हा विरोध जातीय हिंसाचारात रुपांतरित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अफगाणिस्तान पुन्हा 1992-96 च्या दरम्यान झालेल्या गृहयुद्धात ढकलला जाऊ नये, अशी भीती आहे.
4अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो सैन्य चालू वर्षअखेरीस अफगाणिस्तानहून मायदेशी परतणार आहे. या पाश्र्वभूमीवर नव्या राष्ट्राध्यक्षांवर देशांतर्गत सुरक्षेचे खूप मोठे आव्हान असणार आहे.
4गेल्या काही दिवसांत तालिबान्यांच्या हिंसक कारवायांत लक्षणीय वाढ झाली आहे. 2क्क्1 मध्ये तालिबान राजवटीच्या पाडावानंतर आंतरराष्ट्रीय सैन्याच्या हवाली अफगाण सुरक्षा अवलंबून होती.