नवी दिल्ली - पुढील वर्ष संपूर्ण जगासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील ४० हून अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, इग्लंड, युरोपसह बांगलादेश आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि तैवानमध्ये जानेवारीत निवडणुकीचा हंगाम सुरू होईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. जगभरातील निवडणुकांचा परिणाम मतदानाच्या खूप आधीपासून मतदारांना आकर्षित करण्याच्या स्वरूपात दिसू लागला आहे.
युरोपयुरोपियन युनियनमधील २७ देशांतील मतदार राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान करतील. सध्याचे ट्रेंड उजव्या पक्षांच्या बाजूने झुकले आहेत.मुख्य मुद्दे : महागाई, प्रवाशांबाबत धोरण, परराष्ट्र धोरण
अमेरिकाअध्यक्ष जो बायडेन निवडणूकपूर्व अंदाजांमध्ये मागे आहेत. बायडेन यांची तब्येत हाही एक मोठा मुद्दा आहे. कायदेशीर आव्हाने असूनही डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी.मुख्य मुद्दे : युक्रेन युद्ध, अर्थव्यवस्था आणि प्रवासी धोरण
रशियाअध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे पसंती रेटिंग चांगले असल्याने तेच सत्तेत राहतील असे दिसते. मात्र, मतदान कमी झाल्यास त्यांच्यासमोर संकट आहे.मुख्य मुद्दे : युक्रेन युद्ध आणि अर्थव्यवस्था
भारतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. विरोधकांसाठी हाच मुद्दा आहे.मुख्य मुद्दे : महागाई, बेरोजगारी, काश्मीर आणि आयोध्येतील राम मंदिर
१० प्रमुख देशांच्या निवडणुकाबांगलादेश ७ जानेवारीतैवान १३ जानेवारीइंडोनेशिया १४ फेब्रुवारीइराण ०१ मार्चरशिया १७ मार्च भारत एप्रिल-मेदक्षिण आफ्रिका मे-जूनयुरोपीय संघ ६ जूनअमेरिका ५ नोव्हेंबरव्हेनेझुएला, मेक्सिको, पाकिस्तान, ट्युनिशिया,ऑस्ट्रिया, बेल्जियममध्येही २०२४ मध्ये निवडणुका आहेत.