कोरोना व्हायरसमुळे इकॉनॉमी स्लोडाउन झाली असली तरी गेल्या १२ महिन्यात एलन मस्कची संपत्ती १५० अब्ज डॉलर इतकी वाढली आहे. तो कदाचित जगातला सर्वात वेगाने पैसे कमावणारा व्यक्ती आहे. मस्कने गेल्या एक वर्षादरम्यान प्रत्येक तासाला १.७३६ कोटी डॉलर म्हणजे १२७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. याचं कारण हे आहे की, जगातली सर्वात मूल्यवान ऑटो कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.
आणखी वाढू शकतात टेस्लाचे शेअर
तज्ज्ञ सांगतात की, जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिकचा विजय झाल्याने टेस्लाच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. कारण हा पक्ष देशात इलेक्ट्रित व्हेइकल्सना देशात वाढण्याच्या बाजूने आहे. इनव्हेस्टर Chamath Palihapitiya नुसार, टेस्लाच्या शेअरची किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा ३ पटीने अधिक वाढू शकते. जर असं झालं तर मस्क हा जगातील पहिला ट्रिलिनेअर ठरेल.
दक्षिण आफ्रीकेत जन्मलेला आणि व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ४९ वर्षीय मस्कची टेस्लामध्ये २० टक्के भागीदारी आहे. तो स्पेसएक्सचा सीईओ सुद्धा आहे. प्रायव्हेट स्पेस रेसमध्येही त्याची कंपनी बेजोसची कंपनी ब्लू ऑरिजिन एलएलसीसोबत स्पर्धा करत आहे.
मस्कची एकूण संपत्ती ६ जानेवारीला १८४.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार मस्कची एकूण संपत्ती बेजोसपेक्षा केवळ ३ अब्ज डॉलर कमी राहिली होती. बेजोस ऑक्टोबर २०१७ मध्ये जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर बसला होता. त्याची संपत्ती १८७ अब्ज डॉलर होती. मात्र, गुरूवारी टेस्लाच्या शेअरने घेतलेल्या उडीने त्याला ही खुर्ची सोडावी लागली. टेस्लाने गेल्यावर्षी ५ लाख कार्स तयार केल्या आहेत आणि डिलीवर केल्या आहेत.
नव्या वर्षाला सुरूवात होऊन केवळ एक आठवडा उलटला आहे. पण तरी मोठे बदल बघायला मिळत आहे. मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला तर चीनचा झोंग शॅनशॅन दिग्गज इनव्हेस्टर वारेन बफेला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर आला आहे. गेल्या सात दिवसात त्याची संपत्ती १५.२ अब्ज डॉलरने वाढली आहे.