एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 04:07 PM2024-09-20T16:07:12+5:302024-09-20T16:08:06+5:30

जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांच्या कंपनीचा हा सायबर ट्रक आहे. हा ट्रक चेचेन्यांना कसा मिळाला हा एक मोठा प्रश्नच आहे.

Elon Musk is also confused! Tesla's Cyber Truck Entry into Russia-Ukraine War; Gun shot up to seven km | एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा

एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा

चेचेन्या या दहशतवादी गटाचा लीडर रमजान कादिरोवने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने चपळतेसाठी टेस्लाचे दोन सायबर ट्रक युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरविले आहेत. एवढी महागडी बहुउपयोगी कार युद्धात उतरविण्यात आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. 

जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांच्या कंपनीचा हा सायबर ट्रक आहे. हा ट्रक चेचेन्यांना कसा मिळाला हा एक मोठा प्रश्नच आहे. एकीकडे अमेरिका युक्रेनला रशियाविरोधात शस्त्रास्त्रे पुरवत असताना अमेरिकेतील सर्वात अद्ययावत आणि दणकट ट्रक युक्रेनविरोधात वापरला जात आहे. 

कादिरोवचा असा दावा आहे की त्याला स्वत: एलन मस्कनी सायबर ट्रक गिफ्ट केले आहेत. मस्क यांनी या दावाचे खंडन केलेले असले तरी फोटोत सायबर ट्रक, त्यावर गन लोड केलेली दिसत आहे. १९ सप्टेंबरला कादिरोवने केलेल्या दाव्यात मस्क यांनी हे सायबर ट्रक रिमोटली डिस्कनेक्ट केले आहेत. परंतू मला याचा काहीच फरक पडत नाही. या गाड्या विना रिमोट देखील चालू शकतात. याचा वापर आम्ही योग्य प्रकारे करत आहोत, असे म्हटले आहे. 

तर आज, २० सप्टेंबरला पश्चिमी देशांची शस्त्रे त्यांच्याच साथीदारांविरोधात एकदम योग्य आणि अचूक काम करत आहेत. युक्रेनमध्ये दोन सायबरट्रक मशीन गनसह पाठविले आहेत, असा दावा कादिरोवने केला आहे. युद्धात अशा प्रकारच्या ताकदवर, कुठेही कशीही पळू शकणाऱ्या वाहनांची मोठी मागणी आहे, असे त्याने म्हटले आहे. या वाहनांना कादिरोवने हिरवा रंग दिला आहे. 

मशीनगन तर त्याहून भारी...
M2 ब्राउनिंग मशीन गन या सायबर ट्रकवर बसविण्यात आली आहे. ही गन प्रति मिनिट 450 ते 600 राउंड फायर करते. गोळी 890 मीटर प्रति सेकंद वेगाने शत्रूच्या दिशेने जातेही गन 1.8 किलोमीटर ते 7.4 किलोमीटरपर्यंत गोळीबार करू शकते.

Web Title: Elon Musk is also confused! Tesla's Cyber Truck Entry into Russia-Ukraine War; Gun shot up to seven km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.