जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांनी अलीकडेच भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना Twitter वर फॉलो करणे सुरू केले आहे. इलॉन मस्क यांच्या अकाउंटवर नजर ठेवणाऱ्या व्हेरीफाइड Elon Alerts ट्विटर अकाउंटने याबाबत माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, PM Modi यांना ट्विटरवर 87.7 मिलियनपेक्षा जास्त युजर फॉलो करतात. आता या लिस्टमध्ये इलॉन मस्क यांचेही नाव सामील आहे. तसेच, Tesla आणि Twitter चे CEO मस्क फक्त 195 लोकांनाच फॉलो करतात.
इलॉन मस्क यांनी नरेंद्र मोदींना फॉलो करणे सुरू केल्यापासून युजर्स विविध अंदाज बांधत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, लवकरच मस्क भारतातटेस्लाच्या कार्स आणणार. यासाठीच त्यांनी पीएम मोदींना फॉलो केले आहे. परंतू, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.
मस्क यांचे सर्वाधिक फॉलोवरअलीकडच्या काळात इलॉन मस्क यांनी बराक ओबामांना मागे सोडत ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती बनले आहेत. सध्या मस्क यांना 134.3 मिलियन यूजर फॉलो करतात तर ओबामा यांचे 133.04 मिलियन फॉलोवर्स आहेत.