Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला X सारख्या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) त्यांच्या पोस्ट आणि अचानक घेतलेल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विशेषत: गेल्यावर्षी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) खरेदी केल्यानंतर ते जास्तीच चर्चेत आले. आता त्यांनी थेट फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना एक मोठी ऑफर दिली आहे.
मस्क यांनी मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना $1 अब्जाची ऑफर दिली आहे. यासाठी त्यांनी फेसबुकचे नाव बदलण्याची अट ठेवली आहे. X वर 'द बेबिलॉन बी', या अकाउंटने केलेल्या एका पोस्टला मस्क यांनी रिट्विट केले आहे. पोस्टमध्ये पोर्टलने दावा केला की, इलॉन मस्क यांनी मार्क झुकरबर्ग यांना फेसबुकचे नाव बदलण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स देऊ केले आहेत.
या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी, यापेक्षा चांगले नाव असू शकत नाही, असे म्हटले. दरम्यान, मस्क आणि झुकरबर्ग यांच्यातील वाद नवा नाही. मेटाने 'थ्रेड्स' लॉन्च केल्यानंतर दोघांमधील वाद सुरू झाला होता. यापूर्वी मस्क यांनी मार्क झुकरबर्ग यांना केज फाईटची ऑफर दिली होती. या फाईटची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, पण आजपर्यंत ही लढत झालेली नाही.
विकीपेडियालाही दिली ऑफरदरम्यान, अलीकडेच मस्क यांनी विकिपीडियालाही नाव बदलण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. त्या ऑफरचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.