Elon Musk : मानव गेल्या अनेक दशकांपासून अंतराळातील रहस्ये उळगडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध देशांनी आतापर्यंत अनेक अंतराळ शोध मोहिम राबवली आहे, ज्याद्वारे इतर ग्रहांवर सजिवाची उपस्थिती आणि तिथे राहण्यायोग्य वातावरणाचा शोध घेतला गेला आहे. अशातच, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांनी मंगळाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. मस्क यांच्यानुसार, लवकरच मंगळावर मानवी वस्ती वसवली जाऊ शकते.
स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या एका फॉलोअरच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, 'मंगळावर उतरण्यापासून आपण अवघी काही वर्षे दूर आहोत. पुढील 5 वर्षांत मानव नसलेले यान पाठवले जाईल, त्याच्या पुढील 10 वर्षांत मानवाला मंगळावर पाठवेल जाईल. 20 वर्षात एक शहर आणि 30 वर्षात निश्चितच एक मोठी सभ्यता निर्माण करू शकू...' असे ते म्हणाले.
मस्क यांच्या या पोस्टवर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'बऱ्याच लोकांसाठी हे अकल्पनीय आहे...आशा करतो की, ही प्रगती पाहण्यासाठी मी आणखी 10 वर्षे जगेन.' दुसरा म्हणाला, 'AI, VR आणि आता मंगळ? माझ्या आयुष्यात असे काहीही घडेल अशी अपेक्षाही केली नव्हती. हे खूपच अविश्वसनीय आहे.' दरम्यान, इलॉन मस्क यांनी 2002 मध्ये SpaceX चा पाया घातला. लिक्विड प्रोपेलेंट रॉकेट अंतराळात पाठवणारी ही पहिली खाजगी कंपनी ठरली. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत अनेक प्रकल्पांमध्ये नासाला मदत केली आहे.