जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांनी Twitterचा ताबा मिळवल्यापासून सतत चर्चेत असतात. कधी ते ऑफिसमध्ये रात्र काढल्यामुळे चर्चेत येतात, कधी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी आणि ब्लू टिकसाठी शुल्क आकारल्यामुळे चर्चेत येतात, तर कधी कर्मचाऱ्यांवर राग काढल्यामुळे चर्चेत येतात. यातच आता मस्क यांनी एका महिला पत्रकारावर राग काढणे आणि गैरवर्तन केल्यामुळे चर्चेत आले आहेत.
इलॉन यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोपइलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केल्यापासून चर्चेत आहेत. या डीलमध्ये अनेक चढउतार आले, पण शेवटी मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतलेच. या सर्व वादात आता एका नवीन वादाची भर पडली आहे. कारा स्विशर नावाच्या पत्रकाराने मस्क यांच्यावर शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ही रिपोर्टर 90 च्या दशकापासून इलॉन मस्क यांच्या बातम्या कव्हर करत आहे.
पत्र लिहून पत्रकाराला शिवीगाळ केलीकारा स्विशरने पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, इलॉन मस्कने तिला 'You Are an as...' या विषयासह एक मेल पाठवला. मस्क यांची कारासोबतची वागणूक गेल्या काही वर्षात बदलल्याचे पॉडकास्टमध्ये सांगितले. इतकंच नाही तर ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर कंपनीच्या ऑफिसमध्ये नेमकं काय झालं, याचीही माहिती शेअर केली आहे. आधीच वादाच्या भोवऱ्यात असणारे मस्क यांनी अद्याप काराच्या आरोपांवर भाष्य केले नाही.
कालच एक मोठी चूक मान्य केली होतीमंगळवारीच एक मोठी बातमी आली होती की, इलॉन मस्क यांना त्यांची चूक समजली आहे. त्यांच्या एका ट्विटमध्ये त्यांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात टाळेबंदीचा निर्णय ही त्यांची सर्वात मोठी चूक असल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे कंपनीची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच कंपनीत कार्यरत असलेल्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र आता ते पत्रकाराला शिवीगाळ केल्याने चर्चेत आले आहेत.