Elon Musk Twitter Polc: मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक नवीन पोल(User Poll) सुरू केला आहे. यामध्ये त्यांनी युजर्सना एक प्रश्न विचारला आहे. 'विकीलिक्सचे सह-संस्थापक ज्युलियन असांज (Julian Assange) आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NSA) कॉन्ट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेन (Edward Snowden) यांना माफ करावे का?' असा हा प्रश्न आहे.
गोपनीय आणि संवेदनशील माहिती लीक केल्यामुळे असांजे आणि स्नोडेन, यांना अमेरिका सोडावी लागली होती. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मी कोणतेही मत व्यक्त करत नाहीये, पण हा पोल घेण्याचे आश्वासन दिले होते. असांजे आणि स्नोडेन यांना माफ करावे का?" असे ते म्हणाले. 1 मिलियन मते पडली, ज्यात सुमारे 79 टक्के लोकांनी त्यांना माफ करण्यासाठी 'होय' असे मत दिले आहे.
मस्क यांनी यापूर्वीही असे सर्वेक्षण केले आहेदरम्यान, ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मस्क यांनी अनेकदा अशाच वापरकर्त्यांचे सर्वेक्षण केले आहे. ट्विटरच्या नियमांवर प्रतिक्रिया देण्यापासून ते पूर्वी ब्लॉक केलेली खाती पुन्हा सुरू करण्यापर्यंत, मतदानाचा वापर केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी असाच एक कौल घेतला होता, ज्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करायचे का, असे विचारण्यात आले होते. बहुतेक लोकांनी 'हो' असे उत्तर दिले, त्यानंतर त्यांचे खाते पुन्हा सुरू झाले.