अमेरीकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सने आज (बुधवारी, 20 नोव्हेबर) आपल्या सहाव्या स्टारशिपच्या परीक्षणादरम्यान एक अभूतपूर्व प्रयोग केला. हे पाहून जगभरातील लोक आश्चर्य चकित झाले आहेत. स्पेस एक्सने या स्टारशिपवर एका अंतराळ प्रवाशाच्या रूपात एक केळी ठेवली होती. ही केळी स्पेसएक्सच्या कार्गोमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती. या अंतराळयानाने बुधवारी, 20 नोव्हेंबरला सकाळी दक्षिण टेक्सासमधील SpaceX च्या स्टारबेसवरून उड्डाण केले. स्टारशिप हे रीयूजेबल रॉकेट आहे.
केळी अंतराळात पाठवण्यामागे परंपरेपासून ते भविष्यातील वैज्ञानिक आणि तार्किक विचार आणि योजना आहे. त्याची सुरुवातीची भूमिका शून्य-गुरुत्वाकर्षण संकेतकाच्या रुपाने काम करण्याची आहे. याच्या सहाय्याने अंतराळयान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात केव्हा प्रवेश करत आहे? हे प्रदर्शित केले जाते.
ही सोपी आणि प्रभावी पद्धत अंतराळ शास्त्रज्ञांना स्पेसक्राफ्ट अंतराळात पोहोचण्याचा क्षण सहजपणे ओळखण्यास मदत करते. परंतु एलोन मस्कच्या स्टारशिपवरील केळी केवळ एक परंपरा नाही. तर, SpaceX ने या अपारंपरिक पेलोडचा (केळी) वापर यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) नियामक प्रक्रियेने स्वतःला ओळखण्याची संधी म्हणून केला आहे.
ही केळी अवकाशात पाठवून इलॉन मस्क यांच्या कंपनीने पुढचा मार्ग सुकर केला आहे. जेणेकरून अमेरिकन रेग्युलेटर सहजपणे पेलोड्स अंतराळात नेण्याची परवानगी देऊ शकेल. या प्रयोगाद्वारे, FAA सह भविष्यातील परस्परसंवाद सुलभ आणि सुव्यवस्थित करणे आणि नियामकाकडून होणारा कुठल्याही प्रकारचा विलंब टाळणे हे SpaceX चा उद्दिष्ट.