शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
3
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
4
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
5
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
6
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
7
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
8
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
9
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
10
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
11
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
13
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
14
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
15
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
16
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
17
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
18
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
19
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
20
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर

टेस्लाच्या गाड्यांना आग; कार मालकांची खासगी माहितीही लीक, हॅकर्सनी ठेवली विचित्र अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:40 IST

अमेरिकेत एलॉन मस्क यांच्या टेस्ला गाड्यांना लक्ष्य केलं जात आहे.

Tesla Car Attack: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे चांगलेच चर्चेत आले आहेत. विरोधकांकडून तर मस्क हेच ट्रम्प यांचे सरकार चालवत असल्याचा आरोप केला जातोय. अशातच सायबर गुन्हेगारांकडून एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या गाड्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अमेरिकेत अनेक टेस्ला गाड्यांना आग लावण्यात आली आहे. तर टेस्ला गाडीच्या मालकांची वैयक्तिक माहितीही लीक होत आहे. यामुळे एलॉन मस्क यांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारला लक्ष्य करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी लास वेगासमध्ये असाच काहीसा प्रकार घडला. लास वेगासमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये टेस्लाच्या अनेक कार जळताना दिसत आहेत. लॉस एंजेलिस पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळाजवळ काळ्या रंगाचा पोशाख घातलेला एक व्यक्ती टेस्लाच्या अनेक कार पेटवताना दिसला. 

मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एफबीआयने याला संभाव्य दहशतवादी हल्ला म्हटलं आहे.कॅन्सस सिटीमध्ये दोन टेस्ला सायबर ट्रकला आग लावण्यात आली. त्यानंतर दक्षिण कॅरोलिनामध्ये टेस्ला चार्जिंग स्टेशनला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरोने मोलोटोव्ह कॉकटेल आणि बंदुकीचा वापर केला. या हल्ल्यात टेस्लाच्या किमान पाच वाहनांचे नुकसान झाले. 

एलॉन मस्क यांनीही सोशल मीडियावर वाहनांना आग लावण्याचे हे व्हिडिओ शेअर केले असून त्यांना दहशतवादी घटना म्हटले आहे. या प्रकारची हिंसा वेडेपणा आणि पूर्णपणे चुकीची आहे. टेस्ला फक्त इलेक्ट्रिक कार बनवते आणि असे हल्ले आपल्यावर व्हायला नकोत, असं मस्क यांनी म्हटलं.

दुसरीकडे, सायबर गु्न्हेगारांनी 'डोजक्वेस्ट' नावाची वेबसाइट तयार करून हजारो टेस्ला मालकांची वैयक्तिक माहिती लीक केली आहे. या वेबसाइटवर कार मालकांची नावे, पत्ते आणि फोन नंबर टाकण्यात आले आहेत. या डेटा लीकमुळे टेस्ला मालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कार मालकांनी टेस्लाची गाडी विकून टाकलीय हे सिद्ध केल्यावरच हा डेटा हटवला जाईल असा इशारा हॅकर्सनी दिला आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प