Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मायक्रो ब्लॉगींग साईट ट्विटर (Twitter) विकत घेतली. यासाठी इलॉन मस्कने तब्बल 44 अब्ज डॉलर्स मोजले. ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क अजून एक मोठी कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी केलेले एक ट्विट खूप व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोला (Coca Cola) खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे.
मस्क कोका-कोला खरेदी करणार?इलॉन मस्क यांनी 28 एप्रिल रोजी सकाळी कोका कोला खरेदी करण्याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे. मस्क यांनी ट्विट केले, ''आता मी कोका-कोला विकत घेईन, जेणेकरून मला त्यात कोकेन घालता येईल.'' अवघ्या अर्ध्या तासात या ट्विटला 7 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हजारो कमेंट्स येत आहेत.
कोका-कोला हे नाव कसे पडले?कोका कोला हे एक अतिशय लोकप्रिय शीतपेय उत्पादन आहे. हे जगभर भरपूर प्यायले जाते. कधीकाळी हे पेय कोकाच्या पानांपासून बनवले जायचे. यामुळे काहीप्रमाणात नशाही चढायची. यामुळेच याचे नाव कोका कोला पडले. परंतू, 1906 नंतर कंपनीने कोलाच्या पानांमधून कोकेनला वेगळे केले.