जगविख्यात अब्जाधीश एलन मस्क यांच्याबाबत नेहमीच वेगवेगळे धक्कादायक खुलासे होत असतात. काही दिवसांपूर्वी मस्क यांना त्यांच्याच कंपनीतील महिला अधिकाऱ्यापासून दोन जुळी मुले झाल्याचे समोर आले होते. अशा प्रकारे एलन मस्क हे ९ मुलांचे पिता बनले आहेत. असे असताना मस्क यांच्या वडिलांनी त्याहून धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
एरोल मस्क हे ७६ वर्षांचे आहेत. त्यांनी ३५ वर्षीय सावत्र मुलीशी शारीरीक संबंध असल्याचा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर तिच्यापासून त्यांना दोन सिक्रेट मुलेदेखील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जाना बेजुइडेनहाउटने तीन वर्षांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार एरोल मस्क यांनी एका ब्रिटिश टॅब्लॉईडला ही मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी जानासोबतच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. मुले जन्माला घालण्यासाठीच आपण पृथ्वीवर आहोत, असे ते म्हणाले. मस्क यांच्यानुसार जानाने त्यांच्या पहिल्या अपत्याला २०१७ मध्ये जन्म दिला होता. त्याचे नाव इलियट रश आहे.
जाना ही एरोल यांची दुसरी पत्नी हाइड बेजुइडेनहाउट हिची मुलगी आहे. १९७९ मध्ये एलन मस्क यांची आई मेय हल्दमैन मस्क हिचाशी वेगळे झाल्यावर त्यांनी दुसरे लग्न केले होते. तिच्या आधीच्या पतीपासूनची जाना ही मुलगी आहे. ती तेव्हा ४ वर्षांची होती. एरोल आणि हाइड यांनी १८ वर्षांनी घटस्फोट घेतला.
एलन मस्क यांना जेव्हा जाना प्रेग्नंट असल्याचे समजले होते, तेव्हा त्यांना धक्का बसला होता. एलन आणि एरोल यांच्यात तीव्र मतभेदही झाले होते. यामुळे एलन मला पसंद करत नाही, असे एरोल यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. हाईडपासून एरोल यांना दोन मुले आहेत. जानाला देखील एरोल यांनीच सांभाळले होते.