वॉशिंग्टन : ‘कोविड-१९’च्या साथीशी मुकाबला करत असलेली जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, गेट्स फाउंडेशन तसेच इतर काही संस्थांच्या वेबसाइटमधील माहिती हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या संस्थांचे हजारो ई-मेल, पासवर्ड तसेच कागदपत्रे यातील महत्त्वाची माहिती उघड झाल्याने खळबळ माजली आहे.इंटरनेट माध्यमात हॅकिंग करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवणाºया साइट इंटेलिजन्स ग्रुपने याबाबत म्हटले आहे, की या रोगाविरोधातील लढ्यात विविध संघटनांनी पाठविलेले सुमारे २५ हजार ई-मेल तसेच पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. या ई-मेल, पासवर्ड तसेच कागदपत्रांचे स्क्रीन शॉट टिष्ट्वटरवर झळकविण्यात आले आहेत. हेही हॅकरचेच काम आहे. हे हॅकिंग रविवारी व सोमवारी करण्यात आले आहे.‘साइट’ या संस्थेने म्हटले आहे, की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) ही संस्था या हॅकिंगची सर्वांत मोठी बळी ठरली आहे. एनआयएचचे सुमारे ९,९३८ ई-मेल व पासवर्ड चोरून ती माहिती हॅकरनी सोशल मीडियात झळकवली आहे. त्याशिवाय सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे ६,८५७, जागतिक बँकेचे ५,२१०, जागतिक आरोग्य संघटनेचे २,७३२ ई-मेल व पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. हे सारे ई-मेल व इतर तपशील सोशल मीडियावर उघड करण्यात आला आहे.वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली, असा आरोप काही देशांतील तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे चर्चेत असलेली ही संस्था तसेच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची गेट्स फाउंडेशन या संस्थेची कागदपत्रे व अन्य माहिती हॅक करण्यात आली आहे. त्यातील काही माहिती सोशल मीडियावर उघड होण्याचा प्रकारच या संस्थांची झोप उडविणारा आहे. (वृत्तसंस्था)नवनाझींचे कृत्य असल्याचा कयासहॅकरनी विविध संस्थांचे हॅक केलेले ई-मेल व त्यांचे पासवर्ड हे खरे आहेत की नाही, याची पडताळणी साईट या हॅकरच्या कारवायांवर लक्ष ठेवणाºया संस्थेने अद्याप केलेली नाही.साईटच्या कार्यकारी संचालक रिटा काट्झ यांनी सांगितले, की नवनाझी तसेच गौरवर्णाचा अतिरेकी अभिमान असलेल्या लोकांनी हे हॅकिंगचे कृत्य केले असावे, पण त्याबद्दल निश्चित पुरावा अद्याप मिळालेला नाही.
CoronaVirus: ‘डब्ल्यूएचओ’सह अनेक संस्थांचे ई-मेल, पासवर्ड, कागदपत्रे हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 4:47 AM