शहरं
Join us  
Trending Stories
1
तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला
2
लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या...
3
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
4
विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट
5
'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'
6
"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण
7
विद्यार्थ्यांसाठी APAAR ID योजना राबविण्यास सुरुवात; आयुष्यभर उपयोगी ठरणार..., फायदा काय
8
या पाच प्रश्नांमुळे एकनाथ शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे
9
IPL 2025 साठी 'KKR है तैयार'! अनसोल्ड टॅग लागलेला Ajinkya Rahane कॅप्टन्सीसाठी पहिली पसंती
10
Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी
11
अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
12
विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरणं जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा
13
"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर
14
Rajesh Power Services IPO : पहिल्याच दिवशी पैसा झाला दुप्पट; 'या' IPO नं केला १००% चा फायदा; कोणता आहे शेअर?
15
'तो' शब्द बोलणं अल्लू अर्जुनला पडलं महागात! 'पुष्पा 2' फेम अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
16
२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट
17
'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- "फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून..."
18
मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले
19
९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..
20
सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान

मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 10:28 AM

मुंबईवरून ब्रिटनला निघालेल्या भारतीय प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईवरून मँचेस्टरच्या दिशेने निघालेल्या गल्फ एअर कंपनीच्या विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 

Mumbai Manchester Gulf Air Flight: मुंबई-मँचेस्टर विमानाने ब्रिटनला निघालेले भारतीय प्रवासी अचानक १३ तास कुवैतमध्ये अडकून पडले. मँचेस्टरकडे जात असताना गल्फ एअर कंपनीच्या विमानाचे अचानक कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बहरीनवरून उड्डाण केल्यानंतर दोन तासात हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. पण, यामुळे ६० भारतीय प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

एका प्रवाशाने एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारतीय परराष्ट्र आणि व्यवहार मंत्रालयाचे लक्ष वेधलं. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. आम्ही बहारिनवरून मँचेस्टरच्या दिशेने उड्डाण केले होते. स्वाक ००७७ आपातकालीन परिस्थिती उद्भवल्याने विमान कुवैतमध्ये उतरवण्यात आले आहे. पण, विमानतळावर अधिकारी सांगत आहेत की, फक्त ब्रिटिश आणि युरोपीय नागरिकांनाच हॉटेल उपलब्ध करून दिल्या जातील. कारण त्यांना आगमन व्हिजा मिळू शकतो. तुम्ही यात हस्तक्षेप करू शकता का?, असे या प्रवाशांने म्हटले होते. 

त्यानंतर भारतीय दूतावासाने कुवैतमधील गल्फ एअरशी संपर्क करून हा मुद्दा उपस्थित केला. दुतावासातील एक टीम प्रवाशांच्या मदतीसाठी आणि एअरलाईन कंपनीशी समन्वयासाठी विमानतळावर पाठवण्यात आली होती. भारतीय प्रवाशांची विमानतळावरील दोन लाऊंजमध्ये व्यवस्था करण्यात आली. 

गल्फ एअर जीएफ ५ विमानाने मुंबईवरून मँचेस्टरसाठी उड्डाण केले होते. मध्ये बहारिन मार्गे हे विमान निघाले होते. मात्र, कुवैतमध्ये लँडिंग करण्यात आले. ६० भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकून पडले होते. या विमानाने सोमवारी सकाळी ४ वाजून ३४ मिनिटाने मँचेस्टरच्या दिशेने उड्डाण केल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली. 

टॅग्स :airplaneविमानMumbaiमुंबईAirportविमानतळInternationalआंतरराष्ट्रीय