फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका दमात बिअरची बाटली रिकामी करताना दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमुळे ते अडचणीत येऊ शकतात. त्यांच्यावर व्यसनाधीनतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. स्टेड डी फ्रान्स येथे टॉप १४ चॅम्पियनशिप फायनल जिंकल्याच्या सेलिब्रेशनमध्ये मॅक्रॉन टुलूस रग्बी खेळाडूंसोबत सहभागी झाले होते. यादरम्यान मॅक्रॉन यांना लोकप्रिय बिअर ब्रँड - कोरोनाची बाटली ऑफर करण्यात आली.
यावेळी मॅक्रॉन यांनी आवेशात केवळ १७ सेकंदांमध्ये बिअरची बॉटल रिकामी केली. ते बिअर पिताना आजूबाजूचे लोक उत्साहात ओरडतानाही ऐकू येतात, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता मॅक्रॉन यांच्या या व्हिडीओवर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले की, राष्ट्राध्यक्ष हे एक आदर्श आहेत. त्यांनी देशातील लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. निरोगी जीवनशैली आणि चांगल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रीन्स पक्षाचे खासदार सँड्रीन रुसो यांनी म्हटले की, राजकीय नेतृत्व आणि विषारी मर्दानगी एका चित्रात दिसते.