इस्लामाबाद - यशस्वी क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणारे तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान हे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची पाकिस्तानात चर्चा आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाहोरमध्ये इमरान यांनी विवाह केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. इमरान अध्यात्माच्या विषयावर ज्या महिलेशी सल्ला-मसलत करायचे तिच्याशी लग्न केल्याचे बोलले जात आहे.
एक जानेवारीच्या रात्री इमरान यांनी लाहोरमध्ये विवाह केला आणि दुस-याच दिवशी इस्लामाबादमध्ये दहशतवादविरोधी कोर्टात हजर राहून त्यांनी जामीन घेतला असे पाकिस्तानी माध्यांनी म्हटले आहे. तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य मुफ्ती सईद यांनी हा विवाह जुळवला. जेव्हा मुफ्ती सईद यांना इमरानच्या विवाहाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर द्यायचे टाळले.
पक्षाचे सचिव अवन चौधरी आणि पार्टी प्रवक्ते नईम अल हक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मागच्यावर्षी इमरान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्याने गंभीर आरोप केले होते. इमरान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात असा गंभीर आरोप आयेशा गुलालई या महिला नेत्याने केला होता. क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या इमरानवर राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आरोप झाला होते. यापूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवत असताना इमरानचे अनेक महिलांसोबत नाव जोडले गेले होते.
जेमिमा खान क्रिकेटला अलविदा केल्यानंतर इमरान खानने 1995 साली ब्रिटनमध्ये रहाणा-या जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले. लंडनमध्ये बराच काळ जेमिमा बरोबर घावल्यानंतर 16 मे 1995 रोजी इमरानने जेमिमाबरोबर लग्न केले. पण नऊवर्षातच त्यांचा संसार मोडला.
सीत व्हाईट
1987-88 च्या दशकात इमरान खान सीता व्हाईट या अमेरिकन तरुणीसोबत डेट करत होता. जेव्हा सीता त्याच्यापासून गर्भवती राहिली तेव्हा इमरानने अपत्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. अखेर लॉस एंजिल्स कोर्टाने इमरानचा त्या मुलीचा पिता असल्याचा निकाल दिला.
झीनत अमान 1980-90 च्या दशकात झीनत अमान बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिच्याशी सुद्धा इमरान खानचे नाव जोडले गेले होते.
बेनझीर भुत्तोख्रिस्टोफर सँडफोर्ड यांनी इमरान खानवर बायोग्राफी लिहीली. त्यामध्ये त्यांनी इमरान खानचे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. कारण दोघेही ऑक्सफोर्डमध्ये एकत्र शिकत होते.
रेहाम खान इमरान खान यांनी ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही. रेहामन घटस्फोट घेतला आणि पुन्हा मायदेशी परतली.