लंडन : भारतात कोट्यवधी रुपयांची बँक कर्जे बुडविणाऱ्यांना आपल्या देशात मुक्काम करू देईल एवढी इंग्लडमधील लोकशाही उदार आहे, अशा शब्दांत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय मल्ल्या यांचे नाव घेता आपली नाराजी व्यक्त केली. कर्ज चुकवणे व बुडवणे हा मुख्य प्रश्न असून त्याला उत्तर शोधले पाहिजे व भारतातून यापुढे कायद्याला चुकवून कर्जबुडवे जाऊ शकणार नाहीत, असे ते म्हणाले. ‘‘अनेकांचा असा विचार असतो की एकदा तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले की ते परत करायची गरज नाही आणि तुम्ही लंडनमध्ये येऊन राहू शकता आणि कर्ज बुडविणाऱ्यांना येथे राहू देण्याएवढी लोकशाही उदारमतवादी आहे, असे जेटली म्हणाले.लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सच्या दक्षिण अशिया केंद्राने आयोजित केलेल्या ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया : व्हीजन फॉर द नेक्स्ट डिकेड’ यावरील सत्रात ते शनिवारी बोलत होते. कर्ज चुकविणाऱ्यांवर प्रथमच कठोर कारवाई होताना तुम्ही बघत आहात. यापूर्वी असे झालेले नाही. पूर्वी कर्ज चुकविणारे पळून गेलेले नाहीत आता ते पळून गेले आहेत व त्यांची मालमत्ता जप्त झाली आहे, हा संदेश भारत प्रथमच देत आहे. यापूर्वी कर्ज चुकविणाऱ्यांना सहन करायचे आम्ही शिकलेलो आहोत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
कर्ज चुकव्यांना आश्रय देण्याइतकी इंग्लंडची लोकशाही उदार - जेटली
By admin | Published: February 27, 2017 4:40 AM