शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

सीरियन स्थलांतरितांचा सायकलवरुन रशियामार्गे युरोपात प्रवेश

By admin | Published: September 13, 2015 2:19 AM

भूमध्य समुद्राचा सर्वात कठिण आणि जीवावर बेतणाऱ्या मार्गाला काही सीरियन लोकांनी पर्याय शोधला आहे. संपुर्ण युरोपला वळसा घालून रशियामार्गे हे स्थलांतरित नॉर्वेमध्ये जात आहेत.

मॉस्को : भूमध्य समुद्राचा सर्वात कठिण आणि जीवावर बेतणाऱ्या मार्गाला काही सीरियन लोकांनी पर्याय शोधला आहे. संपुर्ण युरोपला वळसा घालून रशियामार्गे हे स्थलांतरित नॉर्वेमध्ये जात आहेत. विशेष म्हणजे युरोपला जाण्यासाठी चक्क सायकलचा वापर ते करत आहेत. इतकेच नव्हे तर या प्रयत्नामध्ये आर्क्टिक वृत्तही त्यांच्याद्वारे ओलांडले जात आहे. रशिया आणि सीरियाचे मुत्सद्दी आणि राजनैतिक पातळीवर संबंद अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे सीरियन लोकांना रशियाचा व्हिसा मिळविण्यात कोणतीही अडचण अथवा विलंब होत नाही. त्यामुळे सीरियातून रशियाची राजधानी मॉस्कोला विमानाद्वारे व तेथून हे नागरिक थेट रशियाच्या वायव्य प्रांतातील मुर्मन्स्क गावापर्यंत रेल्वेने जात आहेत. त्यानंतर नॉर्वेच्या सीमेपासून २० किमी अंतरावर निकेल या गावी ते पोहोचतात. रशिया आणि नॉर्वे यांच्यामधील सीमा केवळ वाहनाद्वारे ओलांडणे हाच केवळ कायदेशीर मार्ग आहे. आणि सायकलला वाहनाचा दर्जा असल्यामुळे निकेलमध्ये सायकल विकत घेऊन स्थलांतरित लोक नॉर्वेमध्ये प्रवेश करतात. सीरियातील हजारो लोक विविध मार्गांनी युरोपात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांची आर्थिक स्थिती मध्यम असल्याने ट्रेनची तिकिटे तसेच मानवी तस्करांची फी देणे त्यांना परवडते. आता रशियामार्गे जातानाही लागणारे पैसे भरुन ते युरोपात जायला तयार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)नॉर्वे-स्वीडनला का पसंती?नॉर्वे आणि स्वीडनला सीरियन नागरिक पसंती देत आहेत कारण हे देश तुलनेत शांत समजले जातात. त्याचप्रमाणे पूर्व युरोप आणि बाल्कन देशांपेक्षा येथे राहणीमान व लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे जर्मनी पाठोपाठ स्कँडिनेव्हिअन देशांमध्ये राहण्यासाठी स्थलांतरित धडपडत असतात.ब्रिटीश नागरिकांचा पाठिंबा : ब्रिटीश नागरिकांनी निर्वासितांच्या बाजूने उभे राहण्याचा निश्चय केला आहे. निर्वासितांच्या हक्कांसाठी हजारो नागरिकांनी सेंट्रल लंडनमध्ये भव्य मोर्चा काढला. पार्क लेन पासून डाऊनिंग स्ट्रीट व नंतर पार्लमेंट स्क्वेअरपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन आणि संगीतकार बिली ब्रॅग यांची भाषणे झाली.जर्मनी तयारीत..जर्मनीच्या दक्षिणेस असणाऱ्या म्युनिचमध्ये पूर्व युरोपातील लोक अजूनही मोठ्या संख्येने येत आहेत. येत्या आठवड्याभरामध्ये 40000 - सीरयन्स म्युनिचमार्गे जर्मनीत येतील असा अंदाज आहे. त्यासाठी जर्मनीने वाहतुक व इतर व़्यवस्था सांभाळण्यासाठी मदतीच्या 4000 - तुकड्या पाठविल्या आहेत. जर्मनीने आपल्या भूमिकेत बदल केल्यानंतर चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि जर्मन लोकांचे कौतुक होत आहे. सीरियन नागरिकांचे जर्मन लोकांनी मनापासून स्वागत केले आहे.