मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटासारखा एक प्रकार लंडनमध्ये पाहायला मिळाला आहे. डिग्रीशिवाय एक तरुणी रुग्णांवर उपचार करत होती. क्रेउएना ज्द्राफकोवा असं १९ वर्षीय तरुणीचं नाव असून तिच्याकडे कोणतीही मेडिकल डिग्री नाही किंवा तिने कधीच एमबीबीएसचं शिक्षण घेतलेलं नाही. पण ती गळ्यात स्टेथोस्कोप घालून आणि पांढरा रंगाचा कोट घालून कोणत्याही रुग्णालयात जायची. तिथे ती डॉक्टर असल्यासारखं दाखवायची.
ऑडी सेंट्रल न्यूजच्या वृत्तानुसार, तरुणी स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत असे, तिच्यात इतका आत्मविश्वास होता की, कोणालाच शंका यायची नाही. ती लंडनमध्येच इलिंग हॉस्पिटलमध्ये जात होती. रुग्णांच्या गर्दीत ती लोकांना सूचना द्यायची. रुग्णांच्या कुटुंबीयांनी ती खरी डॉक्टर वाटायची. काही वेळा ती रुग्णाच्या कुटुंबीयांचं सांत्वन करायची.
काही वेळा रुग्णाला एक-दोन औषधे लिहून द्यायची, हा ट्रेंड अनेक महिने इलिंग हॉस्पिटलमध्ये सुरू होता. ती खोटी डॉक्टर आहे हे कोणाच्या लक्षातही आलं नाही. तरुणी रोज रुग्णालयात यायची, कर्मचाऱ्यांनी तिची दखल घ्यायला सुरुवात केली. हळूहळू संशय वाढत गेला. नंतर चौकशी केली असता असं आढळून आलं की, तिच्याकडे कोणतीही डिग्री नाही.
या संपूर्ण प्रकरणात क्रेउएनाच्या वकिलाचं म्हणणं आहे की, पैसे नसल्यामुळे ती कधीच मेडिकल कॉलेजला जाऊ शकली नाही. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. ते स्वप्न जगता यावं म्हणून तरुणी हे करत होती. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.