व्हिएन्ना : नववर्ष समारंभात अथवा तत्पूर्वी गोळीबार वा बॉम्बस्फोट अशा घटनांची शक्यता विचारात घेऊन युरोपातील सर्व राजधानींमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गुप्तचरांच्या सेवेने ‘मैत्रीपूर्ण’ इशारा शनिवारी दिल्याचे व्हिएन्ना पोलिसांनी सांगितले. पॅरिस हल्ल्यानंतर युरोप खंडातील सर्व देशांत पोलीस विशेष काळजी घेत आहेत. संभाव्य हल्लेखोरांची यादी बनविण्यात आली असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. अद्याप काही ठोस हाती आलेले नाही; पण आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पॅरिस हल्ल्याने सर्वांनाच हेलावून सोडले. जर्मनीनेही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. देशात दहशतवादाचे जाळे असल्याने आम्ही आवश्यक ती काळजी घेत आहोत, असे जर्मन अंर्तगत मंत्रालय सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
नववर्षानिमित्त युरोपात हाय अलर्ट
By admin | Published: December 28, 2015 12:24 AM