जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 21:32 IST2025-03-21T21:31:08+5:302025-03-21T21:32:04+5:30

युक्रेनमध्ये पुतिनद्वारे २०२२ पासून केलेल्या जाणाऱ्या अत्याचारावर तटस्थ भूमिका सोडून स्वीडन आणि फिनलँड अलीकडेच नाटोत सहभागी झालेत.

Europe is gearing up for World War III with survival guides, nuclear bunkers and conscription plans to survive a Russian invasion | जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी?

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी?

बर्लिन - रशियाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण युरोप सर्वाइवल गाइड, न्यूक्लियर बंकर आणि सैनिकांच्या भरतीसह प्लॅनिंगनं तिसऱ्या महायुद्धाची तयारी करत आहे. व्लादीमीर पुतिन नाटोला पूर्व युरोपातून बाहेर काढणे आणि रशियाचं साम्राज्य विस्तारीत करण्यासाठी युद्धापासून काहीच अंतर दूर आहेत अशी भीती युरोपियन देशांना वाटते. जर पुतिन युक्रेनमध्ये यशस्वी झाले तर २०३० च्या आसपास कुठल्याही क्षणी हल्ला करू शकतात असं युरोपियन संघाला वाटते. त्यामुळेच युरोपियन संघाला रशियाविरुद्ध युद्धाच्या तयारीत राहायचं आहे.

ब्रिटनशी मागितली मदत

युरोपियन देशांनी ब्रिटनकडे पुन्हा एकदा युरोपियन संघात सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे युरोपला दुसऱ्या अण्वस्त्रधारी देशाचा पाठिंबा मिळेल. यासोबतच युरोपियन देश अमेरिकेची अपेक्षा सोडून सैन्यात अधिक भरती करण्याची योजना आखत आहेत. रशियन टँक युरोपात घुसल्यानंतर पॅराट्रूपर्सच्या उतरल्यानंतरच्या स्थितीत नागरिकांनाही तयार केले जात आहे. 

फ्रान्सनं जारी केली गाइडलाईन

फ्रान्सनं आपल्या नागरिकांना आक्रमणापासून वाचण्यासाठी गाइडलाईन जारी केली आहे. २० पानाच्या पुस्तिकेत फ्रान्स नागरिकांना कुठल्याही आक्रमणावेळी राखीव दलात अथवा स्थानिक सुरक्षा दलात सहभागी होऊन देशाचं रक्षण कसं करायचे हे सांगितले आहे. त्याशिवाय ६ लीटर पाणी, डबाभर जेवणे, बॅटरी, आवश्यक आरोग्य साहित्यासह एक गरजेसाठी लागणारं किट कसं बनवायचे याचेही मार्गदर्शन केले आहे.

युरोपला देणार अणु सुरक्षा

या आठवड्याच्या सुरुवातीला फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मॅक्रो यांनी खुलासा केला की, हायपरसोनिक अणु मिसाईल फ्रान्सच्या लढाऊ विमानांसह जर्मनीच्या सीमेवर तैनात आहेत. जर्मनी फ्रान्सच्या अणु सुरक्षेत आहे. जर जर्मनीवर हल्ला झाला तो फ्रान्स संरक्षणासाठी अणुबॉम्ब डागतील कारण ते तो हल्ला फ्रान्सवरील हल्ला समजतील.पोलंडमध्येही फ्रान्स अणु सुरक्षा देण्याचा विचार करत आहेत. 

अमेरिकेकडून अणु शस्त्रे मागत आहे पोलँड

पोलँड, फ्रान्स अथवा अमेरिकेकडून अणु शस्त्रे सुरक्षा मिळवण्याचा विचार करत आहे. पोलँडचे राष्ट्रपती आद्रेंज डूडा यांनी अमेरिकेला त्यांची अणु शस्त्रे त्यांच्या देशात तैनात करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय पोलँडमध्ये सर्व पुरूषांसाठी बंधनकारक सैन्य ट्रेनिंग सुरू करण्यास सांगितले आहे. बाल्टिक आणि नॉर्डिक देशांना रशियाच्या धोक्याची चांगली जाणीव आहे कारण त्या सर्व देशांमध्ये आधीच काही प्रमाणात सैन्य भरतीची व्यवस्था सुरू केली आहे.

तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत जर्मनी

युक्रेनमध्ये पुतिनद्वारे २०२२ पासून केलेल्या जाणाऱ्या अत्याचारावर तटस्थ भूमिका सोडून स्वीडन आणि फिनलँड अलीकडेच नाटोत सहभागी झालेत. जर्मनीने तिसऱ्या महायुद्धाची तयारी केली आहे. त्यासाठी ऑपरेशन ड्यूशलँड नावाने १ हजार पानी गुप्त कागदपत्रे आधीच लीक झालेत. विशिष्ट इमारती, आवश्यक सुविधा तयार केल्यात, आपत्कालीन स्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने ते वापरले जातील. सरकारने बंकरांची यादीही तयार करत आहे ज्यात नागरिकांना सुरक्षित ठेवले जाईल.

Web Title: Europe is gearing up for World War III with survival guides, nuclear bunkers and conscription plans to survive a Russian invasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.