इस्लामाबाद : अल्पसंख्य हिंदुंच्या विवाहांचे नियमन करण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेने महत्त्वाचे विधेयक संमत केले. या विधेयकामुळे पाकिस्तानी हिंदुंना विवाहाचे नियमन करणारा विशेष व्यक्तिगत कायदा उपलब्ध झाला आहे. हिंदू विवाह विधेयक, २०१७ नॅशनल असेम्ब्लीने गुरुवारी संमत केले. या विधेयकाची प्रदीर्घ काळपासून प्रतीक्षा होती. नॅशनल असेम्ब्लीने हे विधेयक संमत करण्याची ही दुसरी वेळ होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे विधेयक संमत झाले होते. परंत सिनेटने फेब्रुवारी महिन्यात ते स्वीकारले, तेव्हा त्या विधेयकात सिनेटने बदल केल्यामुळे ते परत संमत करून घ्यावे लागले. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन कायद्याची अंमलबजावणी व्हायच्या आधी नियमानुसार संसदेच्या दोन्हीही सभागृहांनी एकच विधेयक करणे आवश्यक असते. ती प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल असेम्ब्लीने सप्टेंबरमध्ये मान्य केलेल्या मसुद्यात सिनेटने दुरुस्ती समाविष्ट केली. विधेयकाचा अंतिम मसुदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला. शादी पराथ हा मुस्लिमांत निकाहनामा असतो त्यासारखाच आहे. शादी पराथवर पुरोहिताने (पंडित) स्वाक्षरी केलेली असावी आणि संबंधित सरकारी विभागात त्याची नोंदणी केलेली असावी. हा दस्तावेज साधा असून, त्यात त्यानंतर केंद्रीय परिषद, तहसील, गाव आणि जिल्ह्याचे वराचे, त्याच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख विवाहाचे ठिकाण, पत्ता इत्यादी. त्यात वैवाहिक दर्जाही विचारण्यात आला आहे. उदा. अविवाहीत, विवाहीत, घटस्फोटीत, विधवा आणि अवलंबिंतांची संख्या. असाच तपशील वधुलाही द्यावा लागणार आहे. वधुला तिच्या आईचा उल्लेख करावा लागेल. (वृत्तसंस्था)विवाहाची नोंदणी शक्यवधु आणि वराला दस्तावेजावर एक साक्षीदार व रजिस्ट्रारसह स्वाक्षरी करावी लागेल.. या कायद्याामुळे हिंदू महिलांना विवाहाचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध हाईल. हे विधेयक नॅशनल असेम्ब्लीत गुरुवारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे ख्रिश्चन सदस्य व मानवी हक्क खात्याचे मंत्री कामरान मायकेल यांनी सादर केले.
पाकमध्येही आता हिंदू विवाह कायदा
By admin | Published: March 11, 2017 12:10 AM