ऑनलाइन लोकमत -
कैरो, दि. २९ - इजिप्त एअर विमानाच्या अपहरणकर्त्यांनी 4 परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बर वगळता सर्व प्रवाशांची सुटका केल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. याअगोदर अपहरणकर्त्यांनी लहान मुलं आणि महिलांना सोडून देण्याची तयारी दर्शवली होती. विमानात 8 ब्रिटीश आणि 10 अमेरिकन नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरणकर्त्यांनी परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बरला ओलीस ठेवण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. अपहरणकर्त्यांनी कोणतीही मागणी अजून केलेली नाही. इजिप्त एअरचं अपहरण करणाऱ्याचं नाव इब्राहिम समाहा असं असल्याचं वृत्त इजिप्तच्या सरकारी दूरसंचार वाहिनीनं दिलं आहे.
इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण करुन विमानाचं सायप्रस येथील लरनाका विमातळावर लॅडींग करण्यात आलं. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या विमानाने सकाळी उड्डाण केले असता अचानक सायप्रस येथील लरनाका विमानतळावर एमर्जन्सी लँडींग करण्याची विनंती केली. अपहरणकर्त्यांनी 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Negotiations with the kidnapped result in the release of all the passengers, except the crew and four foreigners.— EGYPTAIR (@EGYPTAIR) March 29, 2016