येरुशलेम - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र म्हणून भारतात प्रसिद्ध झालेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सार्वत्रिक निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. इस्राइलमधील सार्वत्रिक निवडणूक आटोपल्यानंतर प्रकाशित झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नेतान्याहू यांच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे सर्वाधिक काळ इस्राइलचे पंतप्रधानपद भूषणवणाऱ्या नेतान्याहू यांचे पाचव्यांचा देशाचे पंतप्रधानपद भूषवण्याचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्राइलमधील निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. आपले यशस्वी परराष्ट्र धोरण आणि परदेशामधील इस्राइलची भक्कम प्रतिमा अधोरेखित करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे भेटीचे फोटो प्रचारादरम्यान वापरले होते. इस्राइलमध्ये सहा महिन्यांच्या काळात दुसऱ्यांदा होत असलेल्या या निवडणुकीकडे बेंजामिन नेतान्याहूयांच्याचासाठी जनादेश संग्रह म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, एक्झिट पोलचा कल पाहिला तर त्यानुसार देशात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. या एक्झिट पोलनुसार 120 सदस्यीत इस्राइल संसदेत नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला 55 ते 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर नेतान्याहू यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बेनी गैँट यांचा पक्षसुद्धा बबहुमतापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर इस्राइलमध्ये आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. इस्राईलमधिल निवडणुकीबाबत भारतातही उत्साह दिसून येत होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बनलेल्या अनौपचारिक सबंधांमुळे नेतान्याहू हे सत्तेत कायम राहावेत, अशी भारत सरकारची अपेक्।आ आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्राइल यांचाचा संबंध गेल्या काही काळात मजबूत झालेले आहेत.
मोदींचा इस्राइली मित्र पराभवाच्या छायेत? एक्झिट पोलनी वर्तवला धक्कादायक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 1:09 PM