ऑनलाइन लोकमतमास्को, दि. 19 - युनायटेड रशिया पार्टी रशियामध्ये पुन्हा सत्तारूढ होईल, असा अंदाज रविवारी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीनंतर एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला.
सत्तारूढ पार्टीला ४४.५ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली. गत निवडणुकीच्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत जरी घट होणार असली तरी संसदेत राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या सहयोगी पक्षांचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे 'व्हीटीएसआयओएम' या राष्ट्रीय निवडणूक सर्वेक्षण संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
एक्झिट पोलनुसार लिबरल डेमोक्रॅटस् पार्टी १७.२३ टक्के मतांसह दुसर्या स्थानावर राहील. तर कम्युनिस्ट पार्टी १६.६४ टक्के मतांसह तिसर्या स्थानावर राहील, असाही अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. मात्र असे असले तरी सोमवारी निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.